घरमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाचे दरपत्रक निश्चित

निवडणूक आयोगाचे दरपत्रक निश्चित

Subscribe

निवडणूक आयोगाने प्रचार आणि कार्यकर्त्यांसाठी लागणाऱ्या अनेक नानाविध वस्तुंचा बारकाईने विचार करून एक दरसूची जाहीर केली आहे.

निवडणुकीच्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून मतदान होईपर्यंतचा दैनंदिन खर्च निवडणूक आयोगाला सादर करावा लागलो. निवडणुकीच्या काळात एकूण ७० लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत सगळे बसवायचे असल्यामुळे उमेदवार वस्तूंच्या किंमती बाजारभावापेक्षा कमी दाखवले जातात. त्यामुळेच निवडणूक आयोगाने प्रचार आणि कार्यकर्त्यांसाठी लागणाऱ्या अनेक नानाविध वस्तुंचा बारकाईने विचार करून एक दरसूची जाहीर केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दरपत्रकानुसार वडापाव १५ रुपये, पोहे ३० रुपये, चहा ८ रुपये, मटण थाळी २५० रुपये आणि शाकाहारी थाळी १०० रुपये दर मोजावा लागणार आहे. निवडणूक आयोगानी जाहीर केलेल्या दरपत्रकाप्रमाणे उमेदवाराला आपल्या खर्चाचा तपशील द्यावा लागतो.

निवडणूक आयोगाचे दरपत्रक जाहीर

नुकतेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे दरपत्रक जाहीर झाले आहे. या दरपत्रात उमेदवारांच्या खर्चाची नोंद होणार आहे. निवडणूक आयोगाच्या दरपत्रकानुसार पाण्याची बाटली १५ रुपये, शीतपेय १५ रुपये या खाण्यांच्या पदार्थाबरोबर अन्य गोष्टींचे दर निश्चित करण्यात आले आहेत. निवडणुकीत दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भाड्याने वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. वडापाव १५ रुपये, चहा ८ रुपये, स्पीकर प्रतिदिनी ३५४ रुपये, झेंडे ३५ पासून ६० रुपयांपर्यंत, टोपी २५ रुपये, बिल्ले १० रुपये, छायाचित्राची पिकत वीस रुपये, अगदी मंडप, खुर्च्या, हारतुऱ्यांपासून फटाक्यांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत. १००० ची माळ साडेसातशे रुपयांनी खरेदी करावी लागणार आहे. निवडणुकींच्या काळात वापरल्या जाणऱ्या प्रत्येक खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. टाचणी पासून प्रचाराच वापरण्यात येणाऱ्या ट्रक पर्यंतचा सर्व हिशोब द्यावा लागणार. पोवाडा पथकाचे दोन हजार तर पथनाट्य पथकाला चार हजार रुपये मोजावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -