घरमुंबईया कारणासाठी प्रेयसीनेच केली साथीदाराच्या मदतीने हत्या

या कारणासाठी प्रेयसीनेच केली साथीदाराच्या मदतीने हत्या

Subscribe

काशिमिरा येथील पत्रकाराच्या कार्यलयात काम करणाऱ्या प्रेयसीनेच साथीदाराच्या मदतीने संपादकाची निर्घुण हत्या करुन भिवंडीत मृतदेह फेकल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे.

काशिमिरा येथील पत्रकाराच्या कार्यलयात कामाला असलेल्या २४ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंधातून तिच्याकडे शारीरिक सुखाच्या मागणीला कंटाळलेल्या प्रेयसीनेच साथीदाराच्या मदतीने संपादकाची निर्घुण हत्या करुन भिवंडीत मृतदेह फेकल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रेयसीने साथीदाराच्या मदतीने संपादकाला रो-हाउस दाखवण्याच्या बहाण्याने एका कारमध्ये डोंगरात नेवून त्याला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत दोघांनी दोरीच्या सहय्याने कारमध्येच त्यांची गळा आवळून निर्घुण हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भिवंडी तालुक्यातील खर्डी गावानजीक निर्जनस्थळी असलेल्या नाल्यात त्यांचा मृतदेह फेकून दिला होता. नित्यानंद पांडे (वय ४६) असे हत्या झालेल्या संपादकाचे नाव आहे. अंकिता मिश्रा असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या प्रेयसीचे तर सतीश मिश्रा असे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अंकिताच्या साथीदाराचे नाव आहे.

दोन वर्षापासून सुरु होती मागणी 

मिळलेल्या माहितीनुसार, मृतक संपादक नित्यानंद पांडे यांचे मिरा रोड परिसरात इंडिया अनबाउंड या साप्ताहिक वृत्तपत्र तसेच मासिक मॅक्झिनचे कार्यलय आहे. त्या कार्यलयात आरोपी अंकिता ही गेली तीन वर्षापसून मदतनीस म्हणून काम करत होती. त्या दरम्यान नित्यानंद आणि अंकितामध्ये प्रेमाचे सुत जुळल्याने त्यातून त्यांचे शारीरिक संबध प्रस्थापित झाले. त्यानंतर सतत २ वर्ष प्रेयसीकडे रोजच शाररीक सुखाची मागणी करत असल्याने ती नित्यानंदच्या अशा विकृत वागण्याला कंटाळली होती. त्यातच इंडिया अनबाउंड या साप्ताहिक वृत्तपत्र आणि मासिक मॅक्झिनची छपाई आरोपी सतीश मिश्रा याच्या प्रिटींग प्रेसमध्ये होते असे. मात्र छपाईची रक्कम देण्यास नित्यानंद आरोपी सतीशला देण्यास टाळाटाळ करत होता. मिरा रोड कार्यलयात आरोपी अंकिता काम करत असल्याने सतीश हा छपाईची थकबाकीची रक्कम मागण्यासाठी जात असे, त्यातून दोघा आरोपीची ओळख होऊन दोघांनी नित्यानंदचा काटा काढण्याचे ठरवले होते.

- Advertisement -

संपादक बेपत्ता असल्याची तक्रार केली 

ठरल्याप्रमाणे मृत नित्यानंदला १५ मार्चला मिरारोड कार्यलयात बोलवून रो हाउस दाखविण्याचे बहाण्याने एका कारमध्ये डोंगरात नेवून त्याला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत दोघांनी दोरीच्या सहय्याने त्यांची गळा आवळून निर्घुण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भिवंडी तालुक्यातील खर्डी गावानजीक निर्जनस्थळी असलेल्या नाल्यात त्यांच्या मृतदेह फेवून दिला होता. नित्यानंद शुक्रवारपासून बेपत्ता असल्याने मृतकची पत्नी पूनम यांनी काशीमिरा पोलीस ठाण्यात शनिवारी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, रविवारी सकाळच्या सुमाराला भिवंडी तालुका पोलीसांना खारबाव रोडवरील खार्डी या गावाच्या हद्दीत रस्त्यालगतच्या नाल्यात नित्यानंदचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

दरम्यान, भिवंडी तालुका पोलिसांनी दोघाही आरोपींचा ताबा घेवून त्यांच्यावर हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -