घरताज्या घडामोडीFadnavis vs Nawab Malik : आरोप झालेल्या सॉलिडस कंपनीवर मलिक कुटूंबीय संचालक,...

Fadnavis vs Nawab Malik : आरोप झालेल्या सॉलिडस कंपनीवर मलिक कुटूंबीय संचालक, काय आहे उलाढाल ?

Subscribe

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे आरोप करताना चर्चा झाली ती म्हणजे सॉलिडस इनवेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नवाब मलिक कुटूंबीयांचे संचालकपद असण्याबाबतची. हा संपुर्ण काय व्यवहार होता तसेच या कंपनीची किती उलाढाल आहे ? तसेच कंपनीचे संचालक पद खरच नवाब मलिकांच्या कुटूंबीयांच्या नावे आहे का ? संपुर्ण व्यवहार कसा झाला ? किती लाखात ही जमीन विकत घेतली ? किती कोटींना विकण्यात आली ? मुंबईच्या चिंधड्या उडवणाऱ्या लोकांकडून नवाब मलिकांनी ही जमीन का विकत घेतली ? तसेच या जमीनीची विक्री झालेल्या कंपनीत नवाब मलिक कुटूंबीय संचालकपदी आहेत, असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काय होता व्यवहार ?

मुंबईच्या एलबीएस रोडवर गोवावाला फॅमिलीची जागा महागडी जागा नवाब मलिक यांनी सलीम पटेलकडून का खरेदी केली ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कुर्ला येथे एलबीएस रोडवरील १ लाख २३ हजार स्केअर फूटची जागा होती. या खरेदीच्या व्यवहारादरम्यान सलीम पटेलने इररिव्होकेबल पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली. या जमिनिची विक्री सलिम पटेल आणि शाहवली खान यांनी केली. हे दोघेही दाऊदची माणसं होती. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. जमीन घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये २०१९मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. या दोघांनी सॉलिडस इनवेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ही जमीन खरेदी केली. या व्यवहारात फराज मलिकने सही केली. ही जमीन नवाब मलिक परिवाराच्या नावे आहे. नवाब मलिक या कंपनीवरही काही काळ डायरेक्टर होते. या दोघांनी सॉलिडसला ही जागा ३० लाख रूपयांमध्ये विकली. पेमेंट २० लाख रूपयांचे झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन खरेदी करण्याची काय गरज होती ? असाही सवाल फडणवीस यांनी केला.

- Advertisement -

मोहम्मद सली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल हा दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा सहकारी आणि फ्रंटमॅन आहे. तिच्यासोबत २००७ मध्ये सलीम पटेलला पकडण्यात आले होते. हसीना पारकर पटेलला पुढे करून संपत्ती बळकविण्याचे काम करायची. या संपत्तीच्या व्यवहारात कुर्ला एलबीएस येथील जागेचाही समावेश आहे. ज्या व्यक्तींना टाडा लावण्यात येतो, त्यांची मालमत्ता सरकार जप्त करते. देशविरोधी कारवाया करणाऱ्यांकडून अशी जमीन खरेदी करण्याचे काय कारण होते ? असाही सवाल फडणवीस यांनी केला आहे.

नवाब मलिकांच्या कुटूंबातील डायरेक्टर कोण ?

नवाब मलिक यांनी पत्नी मेहजबीन यांच्याशी विवाह केला असून त्यांना ४ मुले आहेत. त्यामध्ये मुलगा फराझ, मुलगी निलोफर, मुलगी सना मलिक शेख, मुलगा आमीर अशी कुटूंबातील व्यक्तींची नावे आहेत. सॉलिडस इनवेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर त्यांचा मुलगा आमीर मलिक आणि पत्नी मेहजबीन मलिक हे संचालक पदावर आहेत.

- Advertisement -

कंपनीची उलाढाल काय ?

२५ सप्टेंबर १९७३ साली कंपनीची स्थापना झाली असून या कंपनीचे शेअर कॅपिटल १० कोटी इतके आहे. कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबपर १६८६८ आहे. तर कंपनीची स्थापना ही ४८ वर्षांपूर्वी झाल्याची माहिती आहे. आर्थिक व्यवहारामध्ये ही कंपनी मध्यस्तीचे काम करणारी अशी कंपनी आहे. कंपनीची शेवटची वार्षिक आढावा बैठक ३१ डिसेंबर २०२० रोजी पार पडलेली आहे. तसेच कंपनीची शेवटची बॅलेन्स शीट ३१ मार्च २०२० मध्ये दाखल करण्यात आली आहे. कोहिनूर सिटी मॉलमध्ये कंपनीचे कार्यालय आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -