घरताज्या घडामोडीजगात पहील्यांदाच कोरोनामुक्त रुग्णाच्या शरीराचे थ्री डी कलर स्कॅन , डॉक्टर हैराण

जगात पहील्यांदाच कोरोनामुक्त रुग्णाच्या शरीराचे थ्री डी कलर स्कॅन , डॉक्टर हैराण

Subscribe

जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे ५०. ५ लाख नागरिकांचा मृत्यू झाला असून २५ कोटीहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत. पण असे असले तरी कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना अजूनही काही शारिरीक तक्रारी उ्दभवत आहेत. याचपार्श्वभूमीवर, संशोधकांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीराचे पहील्यांदाच कलर थ्रीडी स्कॅन केले. त्यात रुग्णांच्या शरीरातील अंतर्गत रचनेत मोठे बदल झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनाचा फक्त फुफ्फुसच नाही तर इतर अवयवांवरही दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. यामुळे कोरोना फक्त फुफ्फुसांवर हल्ला करत नाही तर तो संपूर्ण शरीराचेच नुकसान करतो हे पाहून तज्त्रही हैराण झाले आहेत.

- Advertisement -

कोरोनातून बरे झाल्यावरही अनेक रुग्णांमध्ये श्वासासंबंधी तक्रारी उद्भभवत आहेत, तर काहीजणांना डायबेटीस झाल्याचे समोर आले आहे तर काहीजणांना मूत्रपिंड , हृद्यासंबंधी विकार जडल्याचे समोर आले आहे. तर काहीजणांना महिना उलटूनही शारीरिक थकवा, मानसिक संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीराचा अभ्यास करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (UCL)आणि युरोपियन सिंक्रोट्रोन रिसर्च फॅसिलिटी यांनी एका नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत जगात पहील्यांदाच कोरोना संसर्ग होण्याआधी आणि झाल्यानंतर अशा रुग्णाचे शरीर स्कॅन केले. या तंत्राला हॅराक्रियल फेज कंट्रास्ट टोमोग्राफी (HiP-CT)असे म्हणतात. या तंत्राने शरीरातील अवयवच नाही तर त्यातील पेशींचेही रंगीत स्कॅनिंग आणि थ्रीडी इमेज तयार केली गेली. यात पेशी, रक्तवाहीन्यांचेही रंगीत स्कॅनिंग करण्यात आले. हे एक्स रे तंत्रप्रणाली फ्रान्समधील ग्रेनोबल येथील ESRF यांनी बनवले आहे. यात सामान्य एक्स रे पेक्षा तिपटीने अवयवातील बदल टीपले जातात. यामुळे शरीरातील अवयवांमधील बदलच नाही तर रक्तवाहीन्या, धमन्या, पेशी यांच्यात कोरोनानंतर झालेले सूक्ष्म बदलही टीपले गेले आहेत.कोरोनानंतर शरीरात झालेले बदल पाहून संशोधकही हैराण झाले आहेत.

- Advertisement -

कोरोना संसर्गानंतर नसांमधील रक्तप्रवाह थांबतो. यामुळे रक्तात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सूक्ष्म नसा प्रभावित होतात. तसेच ज्या नसा फुफ्फुसांमधील कोशिकांचे कार्य करतात त्यांच्यावरही याचा परिणाम होत असल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णांस श्वास घेण्यास त्रास होतो, हृदयावर ताण येतो त्याचबरोबर रु्ग्णाला मानसिक भ्रम होत असल्याचेही तज्ञ्जांनी सांगितले आहे.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -