घरताज्या घडामोडीभाजपवर आरोप केल्याशिवाय संजय राऊतांना जेवणच पचत नाही, फडणवीस यांचा टोला

भाजपवर आरोप केल्याशिवाय संजय राऊतांना जेवणच पचत नाही, फडणवीस यांचा टोला

Subscribe

ईडीच्या माध्यमातून सत्तांतर हा फक्त आरोप

राज्यात सत्तांतर करण्यासाठी ईडीच्या माध्यमातून घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याच आरोपांवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच राऊत यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नसेल आसा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. राज्य सरकारने ओबीसी आयोगाला इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश दिल्याच्या निर्णयाचे फडणवीस यांनी स्वागत केल आहे. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाला मागास ठरवून पुढील करावाई करावी असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपवर केलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे त्रास देऊन भाजपचा सत्तांतर करण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. फडणवीस यांनी प्रत्युत्तरात या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. ईडीच्या माध्यमातून सत्तांतर हा फक्त आरोप असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत रोज भाजपवर आरोप करत असतात. बहुतेक त्यांना आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही असा टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणा संदर्भातली याचिका पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. न्यायालयात ही याचिका कायम आहे यामुळे हा प्रश्न आता मागास आयोगाकडे देण्यात यावा असे मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने ओबीसी आयोगाला इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश दिल्या आहेत. या निर्णयाचे फडणवीस यांनी स्वागत केलं आहे.

मुश्रीफ यांचा फडणवीस यांच्यावर टोला

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार आता केंद्र सरकारला राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही असं म्हणणारे आता गप्प का आहेत? केंद्र सरकार भाजप सत्तेवर आल्यावर इम्पेरिकल डेटा मिळणार का? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच अधिवेशनात इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी ठराव मंजूर करणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. महाविकास आघाडी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्पर आहे. आरक्षण दिल्याशिवाय राज्य सरकार स्वस्थ राहणार नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. भाजप सरकारमधील नेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठराव करत आहेत. राज्यातील जनता फार काळ सहन करणार नाही.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -