घरदेश-विदेशघराच्या बाल्कनीत कबूतरांना दाणे टाकण्यास कोर्टाने घातली बंदी

घराच्या बाल्कनीत कबूतरांना दाणे टाकण्यास कोर्टाने घातली बंदी

Subscribe

एका कुटूंबाला घरातील बाल्कनीत पक्ष्यांना खाद्यपदार्थां देण्यास बंदी घातली आहे. पक्ष्यांना चारा टाकणाऱ्या लोकांना वैतागून एका दांपत्यांनी सिविल कोर्टात 2011 साली केस दाखल केली होती.

 

पशु पक्ष्यांवर प्रेम करणे त्यांच्यावर माया दाखवणे,त्यांच्यासाठी अन्न पाण्याची सोय करणे प्रत्येक व्यक्तीला आवडते. ही एक कौतुकास्पद कामगिरी आहे. पण या कामगिरीमुळे तुम्ही राहत असणाऱ्या हाऊसिंग सोसायटीच्या कोणत्याही सदस्यांना त्रास होत असेल तर यावर उपाय शोधणे देखिल तितकेच गरजेचे आहे. शहराच्या सिविल कोर्टाने 10 वर्षांनी एका कुटूंबाला घरातील बाल्कनीत पक्ष्यांना खाद्यपदार्थां देण्यास बंदी घातली आहे. पक्ष्यांना दाणे टाकणाऱ्या लोकांना वैतागून एका दांपत्यांनी सिविल कोर्टात 2011 साली केस दाखल केली होती. वर्ली मधील वीनस हाउसिंग सोसायटीमध्ये राहणारे दिलीप शाह (71) यांचं घर असून त्या घराच्या वर जिगिशा आणि पद्‌मा ठाकोरे हे दांपत्य वास्तव्य करतात. जिगिशा पशु-पक्षी कार्यकर्ता आहे.त्यांनी स्वत:च्या बाल्कनीत पक्ष्यांना बसण्याकरीता , खाण्यासाठी मेटल-ट्रे तसेच एक प्लँटफॉर्म बनवले होते. दिलीप शाह आणि त्याच्या पत्नी मीना (68) ने आरोप लावले की इथे मोठ्या संख्येत पक्षी, कबूतरांची ये-जा होत असते.

- Advertisement -

water for birds

वयोवृद्‌ध दांपत्याने पशु-पक्षी कार्यकर्ता जवळ पक्ष्यांमुळे त्यांना होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. पण कार्यकर्ताने काहीच लक्ष दिले नाही. नंतर वयोवृद्ध व्यक्तींनी कोर्टात धाव घेत त्यांची व्यथा मांडली. संपुर्ण घटणा समोर आल्यानंतर सिविल कोर्टाच्या अॅडिशनल सेशन जज ए़ एच़ लड्डाड यांनी निर्णय दिला की, पक्ष्यांना मेटल-ट्रे मध्ये खाद्य देणाऱ्या ठाकोरे परिवारची वागणूक योग्य नाही, कारण त्यांची बाल्कनी तसेच वयोवृद्ध दांपत्याची बाल्कनी वरखली आहे.यानंतर कोर्टाने पक्ष्यांसाठी बालकनीत चारा तसेच इतर खाद्यपदार्थ ठेवण्यास रोख लावण्यात आली.

- Advertisement -


हे हि वाचा – LPG गॅसच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर चिदंबरम म्हणाले, ‘मोदी है, मुमकीन है’!



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -