घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर विविध मुद्द्यांवरून घणाघात

देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर विविध मुद्द्यांवरून घणाघात

Subscribe

१२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजप चांगलाच आक्रमक

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यात आल्यामुळे भाजप चांगलाच आक्रमक झाला. (Devendra Fadnavis slam Thackeray government) विधानसभेवर बहिष्कार टाकत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार कालिदास कोळंबकर यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करत अभिरुप विधानसभा सुरू केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांना मदत केंद्राने करावी, कर्जमाफी, चक्रीवादळात मदत, पीक विमा, राज्याचं अर्थकारण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतील आरक्षण केंद्राने द्यावे, मेट्रोचे काम थांबले केंद्र सरकारने करावे, १०० कोटीची वसुली कारवाई करणार केंद्र सरकार, रेमडेसिव्हीर केंद्र सरकार दोषी, ऑक्सिजन, ब्लॅक फंगससाठी केंद्र सरकार दोषी, लसीकरण केंद्र सरकार जर सर्व केंद्र सरकार करत असेल तर तुम्हाला वडे तळायला बसवलंय का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं. याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष भाजपने विधी मंडळाच्या पायऱ्यांवरच प्रतिविधानसभा सुरू केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विविध मुद्दे, यात कोरोना, मराठा आरक्षण, धान घोटाळा, पीक विमा, लसीकरण आदी मुद्यांवरून ठाकरे सरकारवर घणाघात केला.

- Advertisement -

कोरोनाची राजधानी ही महाराष्ट्र बनला

देशातील कोरोनाची राजधानी ही महाराष्ट्र बनला आहे. महाराष्ट्रात २० टक्के रूग्णसंख्या आहे. सक्रिय रुग्ण प्रमाण २२.२४ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण ३०.५३ टक्के आहे. लसीकरणात महाराष्ट्र क्रमांकावर कारण महाराष्ट्राला सर्वाधिक लसी मोदीजींनी दिल्या, असं फडणवीस म्हणाले. राज्यात या ३ महिन्यात एकूण मृत्यू ६७,२९६ एवढे झाले. एकूण दाखविलेले मृत्यू १, २१, ९४५ एवढे आहेत. म्हणजे या ३ महिन्यात ५५.१९ टक्के एवढे आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला. एप्रिल महिन्याची मुंबईतील मृत्यूंची सरासरी ही ७६४८ एवढी आहे. २०२१ मध्ये प्रत्यक्ष झालेले मृत्यू हे १४,४८४ एवढे आहेत. अतिरिक्त मृत्यू ६८३६ एवढे आहेत. कोविडचे दाखविलेले मृत्यू १४७९ एवढे दाखवले. म्हणजे मुंबईत ५३५७ कोविडचे मृत्यू या एप्रिल मध्ये दाखविलेले नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली. एकट्या मुंबईतील लपविलेले मृत्यू एकूण १७,२५९ एवढे आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. जून महिन्यात अँटीजेनचे प्रमाण ६५ टक्के केले आणि आरटी-पीसीआर ३५ टक्के केले. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी अनेक खेळ केले गेले. केवळ आकडेवारीचा खेळ केला जात आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

विमा कंपन्यांशी साटेलोटे

विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. मोठा घोटाळा यात आहे. तीन वर्षांत १३,५०० कोटींचा हा फायदा विमा कंपन्यांना होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पिकविम्याची आकडेवारी सादर करत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. २०१४ मध्ये १५९६ कोटी, २०१५ मध्ये ४२०५ कोटी, २०१६-१७ मध्ये १९२४ कोटी,२०१८-१८ मध्ये २७०७ कोटी, २०१८-१९ मध्ये ४६५५ कोटी, २०१९-२० मध्ये ५५११ कोटी आणि २०२०-२१ मध्ये केवळ ८२३ कोटी एवढंच पीकविमा देण्यात आला. ही आकडेवारी सादर करत आता कुठे गेले विमा कंपन्यांच्या कार्यालयावर चालून जाणारे? असा सवाल केला.

- Advertisement -

धान घोटाळा हजारो कोटींचा

देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचा धान घोटाळा केल्याचा आरोप सरकारवर केला आहे. कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी कशी झाली? असा सवाल फडणवीस यांनी केला. बोगस बियाण्याचा प्रश्न मोठा आहे. इंग्रज, मुगलांना जे जमले नाही, ते या सरकारने केलं. वारकऱ्यांना अटक करून दाखविण्याचे काम या सरकारने केले. हीच का यांची मर्दुमकी, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

सरकारच्या विरोधात बोलतच राहणार

सोमवारी आणि आज झालेल्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचं भांडण नाही. ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार. माध्यमांवर मार्शलकरवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असं फडणवीस म्हणाले.

इंदिरा गांधीही आवाज दाबू शकल्या नाहीत

या सरकारला आमचा डीएनए माहित नाही. इंदिरा गांधींनीही आणीबाणी लादून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याही आमचा आवाज दाबू शकल्या नाहीत, असं सांगतानाच आम्हाला विधानसभेच्या पायरीवर बसू दिले जात नसेल तर आम्ही प्रेस रुममध्ये जाऊन प्रतिविधानसभा भरवू असा इशारा फडणवीसांनी दिला. त्यानंतर विरोधी पक्षाने विधानसभेच्याच पायरीवर माईकशिवाय प्रतिविधानसभा भरवण्यात आली.


हेही वाचा – महाराष्ट्राला ३ कोटी लसीचे डोस केंद्राने द्यावे, टोपेंनी विधानसभेत मांडला ठराव

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -