घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राला ३ कोटी लसीचे डोस केंद्राने द्यावे, टोपेंनी विधानसभेत मांडला ठराव

महाराष्ट्राला ३ कोटी लसीचे डोस केंद्राने द्यावे, टोपेंनी विधानसभेत मांडला ठराव

Subscribe

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी तयार करण्यासाठी सध्याच्या घडीला फक्त मोठ्या प्रमाणात लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. म्हणूनच केंद्राने लसीकरणासाठी महाराष्ट्राला अधिकाधिक डोस उपलब्ध करून देण्याची गरज आहे. महाराष्ट्राला महिन्यापोटी ३ लाख डोस उपलब्ध झाले तर महाराष्ट्रातील लसीकरण येत्या दोन महिन्यात पूर्ण करणे शक्य होईल. म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ३ कोटी लसीचे डोस उपलब्ध करून देण्याचा ठराव मांडला. महाराष्ट्राची महिन्यापोटी ३ कोटी डोस देण्याची तयारी आहे. त्यामुळेच विधानसभेत संमत झालेला हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू असेही टोपे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक संसर्ग आणि मृत्यूदर असणाऱ्या राज्यात लवकरात लवकर हर्ड इम्युनिटी तयार व्हावी हाच ठरावाचा उद्देश असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात सर्वाधिक संसर्ग असून आतापर्यंत राज्यात २१ डेल्टा प्लस, म्यूकरमायकोसिस ५५०० केसेस आढळल्या आहेत. देशाच्या स्थूल उत्पन्नात राज्याचा वाटा आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाच्या केसेस, मृत्यूदर कमी व्हायला हवा असे टोपे यांनी सांगितले. त्यासाठीच आपल्याला लसीकरण करणे काळाची गरज आहे म्हणूनच ठराव मांडल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या माध्यमातूनच तिसऱ्या लाटेचा धोका टाळता येऊ शकतो. तिसऱ्या लाटेची दाहकता, परिणामकता कमी करायची असेल तर याचेही उत्तर लसीकरण असल्याचे टोपे म्हणाले. राज्याला ३ कोटी लस मिळावी, सार्वभौम महाराष्ट्राच्या सभागृहातून केंद्राला करण्याचा ठराव त्यांनी सभागृहात मांडला.

- Advertisement -

लसीकरणाच्या माध्यमातून सामुहिक प्रतिकारशक्ती लवकरात लवकर लसीकरण व्हावे असे उदिष्ट आहे. म्हणूनच दीड दोन महिन्यात उर्वरीत लसीकरण व्हावे अशी अपेक्षा आहे. देशाच्या पातळीवर महाराष्ट्रात सर्वाधिक असे तीन कोटी ४३ लाख लसीकरण झाले आहे. एकुण ५ वर्षांच्या पुढच्या मुलांना लसीकरणाचे उदिष्ट हे आहे. त्यासाठीच ३ कोटी प्रति महिना लस उपलब्ध झाल्यास दोन महिन्यात सामुहिक प्रतिकारशक्ती तयार करू शकतो. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच सर्व व्यवहार पूर्वस्थितीत होण्यासाठी तसेच लोकल सुरू करण्यासाठीचीही मागणी होत आहे.

लसीकरण प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्या निकष असणारआहे. तसेच ज्या जिल्ह्यात जास्त संसर्ग आणि लसीकरणाच्या बाबतीत जे जिल्हे राज्याच्या सरासरीपेक्षा जिल्हे मागे आहेत, अशा जिल्ह्यात येत्या काळात मोठ्या प्रमाणता लसीकरण करावे लागेल. लसीकरणाच्या बाबतीत देशात केरळनंतर १ टक्क्यापेक्षाही कमी लस वेस्टेज असलेले राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. इतर राज्यात लसीकरणाचे वेस्टेज हे २ ते ३ टक्के इतके आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -