घरताज्या घडामोडीAshish shelar vs kishori pednekar : शेलार महिलांविरोधात अपशब्द वापरूच शकत नाहीत,...

Ashish shelar vs kishori pednekar : शेलार महिलांविरोधात अपशब्द वापरूच शकत नाहीत, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता विशेषत: आशिष शेलार हे कोणतेही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी काहीच नाही. काल झालेल्या पत्रकार परिषद किंवा प्रेस नोटमध्ये याचा अतिशय चुकीचा अर्थ काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, भाजपा आमदार आशिष शेलार शिवसेने विरूद्ध आक्रमक बोलतात. त्यांना शांत करण्यासाठी हा अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलाय का? हा देखील प्रश्न येथे उपस्थित होत आहे. मात्र, मी ही एकदम भक्कमपणे सांगू शकतो की, महापौरांबद्दल किंवा इतर महिलांबद्दल आम्हाला आदर आहे. आशिष शेलार किंवा भाजप कोणीही त्यांच्याबद्दल वाईट किंवा चुकीचे शब्द वापरू शकत नाहीत. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

काँग्रेसने उमेदरवार बदलला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ही निवडणूक भाजपे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे अतिशय मोठ्या फरकाने जिंकणार आहेत. काही बाबतीत राजकारणापेक्षा दूर आपण राहिलं पाहीजे. विशेषत: जिथे सेना प्रमुख सीडीएस यांचा विषय आहे. त्या ठिकाणी असे लूज स्टेटमेंट देण्याऐवजी देशाची आता सर्वोच्च प्राथमिकता हा अपघात का झाला ही आहे. त्याकरिता तिन्ही सेनांची मिळून समिती तयार करण्यात आलेली आहे. ती समिती त्यासंदर्भात चौकशी करतेय. त्यामुळे ती चौकशी होईपर्यंत त्याबद्दल बोलणं हे अतिशय अनुचित अशा पद्धतीचं आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. जर दुसऱ्या बाजूला शिवेसेनेचे खासदार संजय राऊत आक्षेपार्ह बोलत आहेत. तसेच महाविकास आघाडीमधले इतर नेते सुद्धा काही आक्षेपार्ह बोलताहेत. त्यामुळे तुम्हाला एक न्याय आणि आमचा नेता काही बोलला की दुसरा न्याय असं चालणार नाही. जे विरोधी पक्षनेते सरकारविरोधात बोलत आहेत. त्यांच्यावर सूड भावनेने कृती करण्याचं काम आणि कारवाई करण्याचं काम राज्य सरकार करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. असं प्रविण दरेकर म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बसायला खुर्ची दिली होती. पंरतु विरोधक मानसिक आजारी असून एनसीबीने त्यांची रक्तचाचणी करावी असं विधान केलं होतं. त्यावर आता प्रविण दरेकर यांनी प्रितिक्रिया दिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजपचे आमदार आशिष शेलार अडचणीत सापडले आहेत. शेलार यांच्याविरोधात रिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आज आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महापौरांनी केले आरोप फेटाळले आहेत. परंतु दादागिरी करणाऱ्यांसमोर भाजप कधी झुकला नाही. अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिल्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा: ashish shelar vs kishori pednekar : मुस्काटदाबी, दादागिरी करणाऱ्यांसमोर भाजप कधी झुकला नाही – आशिष शेलार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -