घरताज्या घडामोडीMayor vs Ashish Shelar : महापौर वादग्रस्त प्रकरणी आशिष शेलारांना जामीन, म्हणाले...

Mayor vs Ashish Shelar : महापौर वादग्रस्त प्रकरणी आशिष शेलारांना जामीन, म्हणाले महापौरांना…

Subscribe

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणात बुधवारी मरीन लाईन्स पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आशिष शेलार यांनी आज गुरूवारी आपला जबाब नोंदवला. यावेळी शिवसेनेकडून खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करत, त्यांनी आगामी काळात आपला संघर्ष आणखी तीव्र करणार असल्याचे सांगितले. यापुढच्या काळात मुंबईकरांचा आवाज म्हणून भाजपकडून शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात आपले आंदोलन आणखी तीव्र कऱणार असल्याचे सांगितले. मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये आपला जबाब नोंदवल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एफआयर रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले. (Mumabi mayor objectionable comment ashish shelar gor bail move fir quashing petion in high court)

माझी भूमिका पत्रकार परिषद आणि सोशल मिडियावरही स्पष्ट केली होती. मी कोणत्याही व्यक्तीला, महिलांना, महापौरांना उद्देशून ते वक्तव्य केले नव्हते. मी कोणाचेही नाव घेऊन हे वाक्य उच्चारलेले नाही. व्यवस्थेच्या विरोधातील आक्रोश अंगावर आल्यावर त्यापासून लपवण्यासाठीचे काम शिवसेनेच्या सोशल मिडियाच्या लोकांनी केले. जी केस बनूच शकत नाही, ती केस बनवण्याचे काम शिवसेनेकडून करण्यात आले आहे. आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत,त्यामुळे जो खोटा गुन्हा दाखल केला, त्याबद्दल मी जामीन घेतला. या प्रकरणातील एफआयआर रद्द करा ही याचिका मी कोर्टात दाखल केली आहे. त्याची कॉपी पोलीस स्टेशनला दिली आहे. न्यायिक व्यवस्थेतून सत्य बाहेर काढेन असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आम्ही सगळे सहकारी भारतीय जनता पक्ष म्हणून शिवसेना आणि महाविकास आघाडीविरोधात संघर्ष आणखी तीव्र करू असाही इशारा आशिष शेलार यांनी दिला. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, तेवढाच मुंबईकरांचा आवाज हा भारतीय जनता पार्टी आणखी उचलणार असेही ते म्हणाले. इतर कोणत्याही विषयावर मी बोलणार नसल्याचे सांगत त्यांनी संजय राऊतांविरोधातील वक्तव्यावर नकार दिला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -