घरताज्या घडामोडीपरळीच्या जनतेने औकात दाखवून दिली हे विसरला का?, धनंजय मुडेंचा पंकजा मुडेंवर...

परळीच्या जनतेने औकात दाखवून दिली हे विसरला का?, धनंजय मुडेंचा पंकजा मुडेंवर टीकास्त्र

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना माझ्याकडे ४ नंबरचे खातं होतं परंतु धनंजय मुंडेंकडे १२ नंबरचे खातं असल्याचे सांगित औकात काढली होती. यावर धनंजय मुंडेंकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. २०१९च्या निवडणुकीमध्ये तीन चार खाती असणाऱ्या मंत्र्याचा एकदाच ३२ हजार मतांनी पराभव केला तीच आमची औकात असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बीडमधील अष्टी येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारानिमित्त संबोधित करत होते. यावेळी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारामध्ये सरकारवर टीका झाली. माझी तर औकातच काढली असे धनंजय मुंडेंनी सांगितले. मला कळालं नाही. एखाद्या गावात जर पालकमंत्री आणि मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून मी ५० ते १०० कोटींची घोषणा करुन जर ती पूर्ण करत असू तर तुम्ही आमच्यावर टीका करणार यांची औकात आहे का द्यायची? असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

- Advertisement -

तुम्ही तर ५ वर्षे राज्याच्या सत्तेत होता. केंद्राच्या सत्तेत होता. तिथल्या आमदार भाजपचा होता. जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या एक नाही तर दोन आमदार झाले तरीसुद्धा तुम्हाला तुमची विकासाला पैसे देण्याची औकात का दाखवता आली नाही. राहीला माझ्या औकातीचा प्रश्न २०१९च्या निवडणुकीमध्ये महिला बालकल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि जलसंधारण मंत्र्याचा एकदाच ३१ हजार मतांनी पराभव केला ना तीच आमची औकात आहे असे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

एवढ्यावर थांबल्या नाहीत. तुम्हाला काय टीका करायची ते करा आणि कुठल्या थरावर जाऊन टीका करायची आहे ती करा, माझ्याकडे सामाजिक न्याय विभागाचे खातं आहे. हे खात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलं आहे. तुमच्याकडे तीन खाती होती ती समजली नाही. म्हणून परळीच्या लोकांनी तुम्हाला औकात दाखवली. दुसरीकडे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर सामाजिक न्याय ३२ नंबरच्या खात्याची जबाबदारी राष्ट्रवादी अध्यक्ष पवार यांनी याच विश्वासने दिली की ३२ नंबरचे खातं १ नंबरवर नेऊन ठेवू शकतो असे धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : हिवाळी अधिवेशनातच विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल अन् तो काँग्रेसचाच असेल – बाळासाहेब थोरात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -