घरताज्या घडामोडीGujarat : पाकिस्तानी बोटीतून ४०० कोटींचे हेरॉईन जप्त ; ६ जण गजाआड

Gujarat : पाकिस्तानी बोटीतून ४०० कोटींचे हेरॉईन जप्त ; ६ जण गजाआड

Subscribe

गुजरात किनाऱ्यावर ७७ किलोग्राम हेरॉईन घेऊन जाणाऱ्या मासेमारी करणाऱ्या एका पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेण्यात आले आहे.भारतीय जलक्षेत्रमध्ये त्या बोटीच्या चालक दलातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षकांच्या संयुक्त अभियानाव्दारे रविवारी रात्री मादक पदार्थ जप्त करण्यात आले.

गुजरातमधील सुरक्षा जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्वीट् केले आहे की,राज्य एटीएससोबत संयुक्त कारवाईत तटरक्षक दलाने मासेमारी करणारी पाकिस्तानी बोट ‘अल हुसैनी’ला भारतीय जलक्षेत्रामध्ये पकडण्यात आले. याशिवाय बोटीतील चालक दलामधील ६ जणांना गजाआड करण्यात आले आहे. ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे की,त्यांनी जवळजवळ ४०० कोटी रुपयांचे ७७ किलोग्राम हेरॉईन जप्त केले आहे.

- Advertisement -


या पाकिस्तानी बोटीची चौकशी करण्यासाठी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखू किनाऱ्यावर आणण्यात आले. यावर्षी एप्रिल महिन्यात देखील तटरक्षक दल आणि एटीएसने या प्रकारचेच ऑपरेशन केले आहे.त्यावेळेस भारतीय जलक्षेत्रामधून आठ पाकिस्तानी नागरिक आणि १५० कोटी रुपयांची ३० किलोग्राम हेरॉईन घेऊन जाणाऱ्या एका बोटीला ताब्यात घेतले होते.

गेल्या महिन्यात, एटीएसने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यामध्ये एका घरातून ६०० कोटींचे हेरॉइन ड्रग जप्त करण्यात आले होते. यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतामध्ये हेरॉईन ड्रग मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मधील अधिकाऱ्यांनी दोन कंटेनरमधून ३,००० किलोग्रॅम औषध जमा केली होती,ज्याची वैश्विक बाजारातील कींमत २१,००० कोटी इतकी होती.

- Advertisement -

हे ही वाचा – ४ वर्षाखालील मुलांना dextromethorphan सिरप देऊ नये, केंद्र सरकारचे आदेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -