घरताज्या घडामोडीलम्पी स्किन आजाराबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क

लम्पी स्किन आजाराबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क

Subscribe

लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. गोवर्गात अधिक प्रमाणात तर म्हैसमध्ये कमी प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता अधिक असते.

अलिबाग : लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. गोवर्गात अधिक प्रमाणात तर म्हैसमध्ये कमी प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता अधिक असते. लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रायगड जिल्हा प्रशासनं सतर्क झाले असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नाकर काळे यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, डॉ. राजेश लालगे, डॉ. कृतिका तरमाले यांच्यासाहित अधिकारी उपस्थित होते. (District animal husbandry department alerted about lumpy skin disease)

लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. गोवर्गात तीस टक्के, म्हैसमध्ये १.६ टक्के तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता अधिक असते. या आजारात मृत्यू दर १-५ टक्क्यांपर्यंत आढळून येतो. दुग्धउत्पादन मोठया प्रमाणावर घटते तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. अज्ञात रोगाची लागण होत असून हा लम्पी स्किन डिसीज (त्वचारोग) आहे असे तज्ज्ञांनी सांगीतले. अचानक ताप व त्वचेवर गुत्ती (गाठी) येत असल्याने पशुपालन शेतकरी बांधव चितांग्रस्त झाले आहेत. मात्र रायगड जिल्ह्यात असा रोगाचे रुग्ण नसल्याने चिंता करण्याची गरज नाही.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात ५ संशयित रुग्ण सापडली होती, त्यांचे नमुने घेऊन ती पुणे येथे पाठवून त्यांच्यामार्फत देशातील राष्ट्रीय पातळीवर असणारी भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविली होती. मात्र त्याचा अहवाल हा निगेटिव्ह आला असल्याने रायगड जिल्ह्यात सद्यस्थितीत लम्पि रोगाची लागण असलेले एकही जनावर नाही. मात्र पशुसंवर्धन विभागामार्फत योग्य ती काळजी घेतली जात आहे.

या रोगाचा प्रसार प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास (अडीस), गोचीड, चिलटे (कुलीकॉईडीस) यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १- २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ जिवंत राहू शकतात.

- Advertisement -

विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दिली आहे.


हेही वाचा – 2 वर्षानंतर होणार माउंट मेरीची यात्रा; थेट प्रक्षेपण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -