घरताज्या घडामोडीघुसमट होत असेल तर कॉंग्रेसमध्ये या, आम्ही साथ देऊ...नाना पटोलेंची नितीन गडकरींना...

घुसमट होत असेल तर कॉंग्रेसमध्ये या, आम्ही साथ देऊ…नाना पटोलेंची नितीन गडकरींना ऑफर

Subscribe

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना थेट काँग्रेसमध्ये या अशी ऑफर दिली आहे.

अकोला- आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना थेट काँग्रेसमध्ये या अशी ऑफर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून गडकरी पक्षाच्या कारभारावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गडकरींनीही अनेकवेळा बोलताना आपली ही नाराजीही जाहीर केली आहे. याचपार्श्वभूमीवर “नितीन गडकरींनी भाजपामध्ये घुसमट होत असल्यास काँग्रेसमध्ये यावं, त्यांची आम्ही साथ देऊ असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नाना पटोलेंच्या या ऑफरवरून राजकीय वर्तुळातही तर्कवितर्क लढवले जात आहेत. अकोल्यामध्ये एका कार्यक्रमात माध्यमांबरोबर बोलताना पटोले यांनी ही ऑफर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून गडकरींना अनेक महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतून डावलण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपच्या संसदीय मंडळातूनही गडकरींना डावलण्यात आले. यामुळे भाजपकडून जाणीवपूर्वक गडकरींचे महत्व कमी केले जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर बोलताना पटोले यांनी “नितीन गडकरींनी भाजपामध्ये घुसमट होत असल्यास काँग्रेसमध्ये यावं, आम्ही त्यांची साथ देऊ असे म्हटले आहे. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाते. भाजपविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -