घरताज्या घडामोडी2 वर्षानंतर होणार माउंट मेरीची यात्रा; महापालिकेची जय्यत तयारी

2 वर्षानंतर होणार माउंट मेरीची यात्रा; महापालिकेची जय्यत तयारी

Subscribe

दोन वर्षानंतर आता 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान माऊंट मेरीची यात्रा होणार आहे. या जत्रेला 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. या जत्रेला वांद्रे महोत्सव म्हणूनही ओळखले जाते. आता 2 वर्षानंतर ही जत्रा होणार असल्याने दररोज एक लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या जल्लोषात सण व उत्सव साजरे केले जात आहेत. नुकताच मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. त्यानंतर आता इतर सणही उत्साहात साजरे केले जात आहेत. त्यानुसार आता वांद्रे येथील माऊंट मेरीची यात्रा होणार आहे. (mount mary fair 2022 will be held from September 11 to 18)

दोन वर्षानंतर आता 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान माऊंट मेरीची यात्रा होणार आहे. या जत्रेला 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. या जत्रेला वांद्रे महोत्सव म्हणूनही ओळखले जाते. आता 2 वर्षानंतर ही जत्रा होणार असल्याने दररोज एक लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाद्वारे विविध नागरी सेवा सुविधांबाबत सुयोग्य तयारी करण्यात आली असून भाविकांच्या सेवेसाठी महानगरपालिका सुसज्ज आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच युट्युब, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांद्वारे या यात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

“यंदा 11 ते 18 सप्टेंबर यादरम्‍यान माऊंट मेरीची होणार आहे. गेली दोन वर्षे म्हणजेच सन 2020 व 2021 मध्ये ‘कोविड-19’ च्या प्रादुर्भावामुळे या यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, या साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या विविध उपायोजना आणि प्रभावीपणे राबविलेली लसीकरण मोहीम यामुळे यंदा कोविड संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आहे.”, असेही विनायक विसपुते यांनी म्हटले.

- Advertisement -

या यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेकडून यात्रा सुरळीतपणे पार पाडण्‍यासाठी सर्व उपाययोजना करण्‍यात येत आहेत. चर्च ऑथॉरिटीने दिलेल्‍या माहितीनुसार यावर्षी प्रतीदिन साधारण 1 लाख भाविक दर्शनासाठी व यात्रेसाठी येतील अशी अपेक्षा आहे. येणाऱ्या भाविकांच्‍या सोयीसाठी आणि स्‍थानिक परिसरातील गर्दी टाळण्‍यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांच्‍या सहयोगाने वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्‍यात आले आहेत.

माउंट मेरी यात्रेसाठी महानगरपालिकेची तयारी

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे या परिसराच्या देखरेखीकरीता १०० पेक्षा अधिक ‘सीसीटीव्‍ही’ कॅमेरे बसविण्‍यात आले आहेत.
  • यात्रेला येणारे भाविक हे या परिसरात प्रामुख्याने पायी चालतात, ही बाब लक्षात घेऊन परिसरातील रस्‍त्‍यांची देखभाल – दुरुस्ती योग्य प्रकारे करण्यात आली आहे.
  • यात्रेला येणाऱ्या भाविकांना पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • परिसराच्या स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एक पश्चिम विभागात तील घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कामगार, कर्मचारी व अधिकारी अव्याहतपणे कार्यरत आहेत.
  • ओल्‍या सुक्‍या कच-याची विल्‍हेवाट योग्य प्रकारे व्हावी, यासाठी या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
  • भाविकांच्या सुविधेसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था देखील या परिसरात पुरेशा प्रमाणात करण्यात आली आहे.
  • मा. उच्‍च न्‍यायालयाने निर्देशित केल्‍याप्रमाणे पूजेचे साहित्‍य, खेळणी इत्‍यादींच्‍या विक्रीसाठी माऊंट मेरी रोड, सेंट दि जॉन बॅप्‍टीस्‍टा रोड व केन रोड या ठिकाणी तात्‍पुरत्‍या पिचेसची लिलाव प्रक्रिया पूर्ण करुन सामान्‍य जनतेस व स्‍थानिक नागरीकांना या तात्‍पुरत्‍या जागा यात्रेच्‍या कालावधीत उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत.
  • या परिसरात अनधिकृत स्‍टॉल्‍स, अनधिकृत फेरीवाले यांना मज्‍जाव करण्‍यात आला आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एक पश्चिम विभागाद्वारे या ठिकाणी उभारण्यात आलेला नियंत्रण कक्ष हा यात्रा कालावधी दरम्यान अव्याहतपणे २४ तास कार्यरत राहणार आहे.
  • आवश्यकतेनुसार भाविकांना वेळच्या वेळी प्रथमोपचार व वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने या ठिकाणी प्रथमोपचार कक्ष उभारण्यात आला आहे.
  • संभाव्‍य आपत्‍कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्‍याचा भाग म्हणून, तसेच तुळशीच्या दृष्टीने निग्राणी ठेवणे पोलिसांना सुलभ व्हावे, यासाठी देखरेख कक्ष व निरिक्षण मनोरा हा मुंबई महानगरपालिकेद्वारे उभारण्यात आला आहे.
  • अग्नि सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई अग्निशमन दलाद्वारे या ठिकाणी बंब तैनात ठेवण्यासोबतच आवश्यक ती अग्निशमन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच मुंबई अग्निशमन दलासाठी स्वतंत्र कक्ष देखील या ठिकाणी उभारण्यात आला आहे.
  • गर्दीच्या प्रभावी नियोजनाचा भाग म्हणून या ठिकाणी आवश्यक ते बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
  • या यात्रेदरम्यान भाविकांना विविध सूचना देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पुरेशा प्रमाणात ध्वनी क्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • यात्रेच्या परिसरात तीन ठिकाणी मोठ्या एलईडी स्क्रीन उभारण्यात आले असून त्या द्वारे देखील भाविकांना दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे.
  • या यात्रेदरम्‍यान बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांकरीता राबविण्‍यात येणारे विविध उपक्रम, विविध योजना, सेवासुविधा इत्‍यादींची माहिती जनसामान्‍यांपर्यन्‍त पोहोचविण्‍यासाठी, तसेच मार्गदर्शन व सूचना देण्‍यासाठी स्‍वतंत्र प्रदर्शन कक्षाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यात द्वारे एक माहिती दालन देखील या ठिकाणी कार्यरत आहे.
  • या ठिकाणी होणारी संभाव्‍य वाहनांची गर्दी टाळण्‍यासाठी व सुरक्षित पार्कींग व्‍यवस्‍थेसाठी खाजगी संस्‍थांना त्‍यांच्‍या ताब्‍यातील मोकळी जागा, शाळांची मैदाने (सुट्टीच्‍या दिवशी), डेपो उपलब्‍ध करुन देण्‍यास विनंती करण्‍यात आली आहे. जेणेकरुन वाहतुक पोलिसांच्‍या माध्‍यमातून या ठिकाणी पार्कींगची व्‍यवस्‍था होऊन रहदारीला बाधा येणार नाही.
  • या यात्रेच्‍या नियोजनाबाबत चर्चचे प्रतिनिधी, स्‍थानिक लोकप्रतिनिधी, स्‍थानिक रहिवासी, पोलिस यंत्रणा, अग्निशमन दल, वाहतुक यंत्रणा, बेस्‍ट उपक्रम व अदानी इलेक्‍ट्रीसिटी यांचे समवेत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने संयुक्‍त बैठक आयोजित करुन यात्रेच्‍या अनुषंगाने करावयाच्‍या संभाव्‍य उपाययोजनांबाबत माहिती करुन सुनियोजन व सुव्यवस्थापन करण्यात आले आहे.
  • संभाव्‍य आपत्‍तीजनक परिस्थिती टाळण्‍यासाठी संस्‍थेच्‍या आवारात कोणताही ज्‍वालाग्रही पदार्थ, गॅस सिलेंडर्स, अनधिकृत स्‍टॉल्‍स इत्‍यादी अवैध धंदयांना थारा देऊ नये असे आवाहन परिसरातील सर्व सहकारी संस्‍थांचे पदाधिकारी यांना करण्‍यात आलेले आहे.

हेही वाचा – राज्यात गणेश विसर्जनाला गालबोट, १९ जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -