घरमहाराष्ट्रनाशिकफार दिवस विरोधात बसायचे नाही; अंबादास दानवे यांचे सूचक विधान

फार दिवस विरोधात बसायचे नाही; अंबादास दानवे यांचे सूचक विधान

Subscribe

नाशिक : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निकाल हा शिवसेनेच्याच बाजूने लागेल. त्यामुळे आपल्याला फार काळ विरोधी पक्षात बसावे लागणार नाही, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी नाशिकमध्ये व्यक्त केला. पण केवळ न्यायालयाच्या निकालावर विसंबून न राहता, प्रत्येक शिवसैनिकाला संघर्ष करावा लागेल. सर्वसामान्य शिवसैनिकच क्रांती घडवतो. ही क्रांती घडवण्यासाठी प्रत्येकाने जिद्दीने पक्षाच्या कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल नाशिकच्या शिवसैनिकांच्या वतीने शुक्रवारी (दि.26) त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. शालिमार चौकातील शिवसेना पक्ष कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे, महिला आघाडीच्या शोभा मगर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले, सर्वसामान्य शिवसैनिकांनी संघटना म्हणजे शिवसेना आहे. कोल्हापूरचे संजय पवार खासदार झाले असते. परंतु, या गद्दार लोकांनी त्यांना पाडले. माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झाला. विजय करंजकर यांना आमदारकी मिळणार होती. काही कारणास्तव ती मिळाली नाही. शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना जनता माफ करणार नाही. छगन भुजबळांना सर्वसामान्य शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी पाडले. तर नारायण राणे, गणेश नाईक यांनाही सर्वसामान्य शिवसैनिकांनी धडा शिकवला. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक हाच संघटनेचा कणा राहिला आहे, असेही दानवे यांनी सांगितले.

दत्तानाना शिवसेनेत मोठे नाव

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड हे शिवसेनेत एक मोठे नाव आहे. पण ‘घर की मुर्गी दाल बराबर’ वाटत असल्यामुळे त्यांना नाशिकमधील शिवसैनिकांना त्यांचे महत्व नसेल. पण आमच्यासारख्या शिवसैनिकांना आहे. सामान्य शिवसैनिक म्हणून आमदार झालो. विजय करंजकर हे आमदार होता होता राहिल्याचेही दानवेंनी सांगितले.

- Advertisement -

संभाजी ब्रिगेड लढवय्या संघटना 

संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील लढाऊ संघटना आहे. शिवसेना ही सर्व जातीधर्माला सोबत घेवून चालणारी संघटना असल्याने संभाजी ब्रिगेडचेही शिवसेनेत स्वागत आहे. या संघटनेने त्यांचे विचार कायम ठेवले तरी शिवसेनेला हरकत असण्याचे काही कारण नाही. कुठल्याही पक्षाने किंवा संघटनेने दुसर्‍यासोबत युती केली म्हणजे विचार सुटतात, असे कधी होत नाही, असेही दानवे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -