घरमहाराष्ट्रमाझ्या नादी लागू नका, प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर भुजबळांची विनंती; म्हणाले...

माझ्या नादी लागू नका, प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर भुजबळांची विनंती; म्हणाले…

Subscribe

हिंगोली : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली वंचित बहुजन आघाडी पक्षाची शनिवारी (25 नोव्हेंबर) मुंबईतील शिवाजी पार्क येथे संविधान सन्मान महासभा पार पडली. या महासभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेत्यांना नादी न लागल्याचा इशारा दिला होता. यावर छगन भुजबळ यांनी हिंगोली येथील महाएल्गार सभेआधी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही अडचणीत असताना प्रकाश आंबेडकर यांनी सहकार्य करावे, अशी विनंती करतो. (Dont mess with me Chhagan Bhujbal request after Prakash Ambedkars warning)

हेही वाचा – OBC Reservation : छगन भुजबळांनी शरद पवार यांचे मानले आभार; पण का?

- Advertisement -

हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला हजर राहण्याआधी छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्लाय इशाऱ्याबद्दल विचारले असता, छगन भुजबळ म्हणाले की, मी प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात एकही शब्द काढलेला नाही. मंडल आयोगासाठी प्रकाश आंबेडकर यांनी फार मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. त्यामुळे आम्ही अडचणीत असताना प्रकाश आंबेडकर यांनी सहकार्य करावे, अशी मी विनंती करतो. विनंती करणे चूक नाही, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली होती.

हेही वाचा – राज्यातील नेत्यांना गावबंदी; छगन भुजबळ यांनी सांगितली संविधानातील 19 कलमांनुसार शिक्षा

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

शिवाजी पार्क येथील संविधान सन्मान महासभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांचे नाव घेऊन त्यांना इशारा दिला होता. ते म्हणाले की, सध्या आरक्षणावरून राज्यात वाद सुरू आहे. पण ओबीसी गटाच्या नेत्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नये. कारण इतिहास काढला तर मंडलच्या वेळेस ते दोघे ‘मंडल’बरोबर नव्हते तर ‘कमंडल’बरोबर होते. भुजबळ किंवा शेंडगे त्यांना त्यांचे आरक्षण वाचवता येत नाही म्हणून हे सर्व सुरू आहे, असा टोला लगावत ओबीसींचे आरक्षण आम्हीच मिळवून दिले, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना सबुरीचा सल्ला देताना म्हटले की, काँग्रेसच्या सल्लागाराने सोनिया गांधी यांना गुजरातमध्ये ‘मौत का सौदागर’ हा शब्द वापरायला सांगितला होता. त्या एका वाक्याने 2009 मध्ये काँग्रेसचे येणारे सरकार आले नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी त्यांच्या सल्लागारांचे ऐकू नये. सोनिया गांधी यांनी सल्लागारांचे ऐकण्याची जी चूक केली होती, ती चूक मनोज जरांगे यांनी करू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -