घरमहाराष्ट्रराज्यातील नेत्यांना गावबंदी; छगन भुजबळ यांनी सांगितली संविधानातील 19 कलमांनुसार शिक्षा

राज्यातील नेत्यांना गावबंदी; छगन भुजबळ यांनी सांगितली संविधानातील 19 कलमांनुसार शिक्षा

Subscribe

हिंगोली : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांकडून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. आपला विरोध दाखवण्यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभरात सभा घेण्यात येत आहेत. पहिला सभा जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झाल्यानंतर दुसरी सभा आज हिंगोलीत होत आहे. यावेळी सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा बांधवांनी राज्यातील नेत्यांना केलेल्या गावबंदीवर भाष्य केलं. त्यांनी संविधानातील 19 कलमांनुसार काय शिक्षा होते याबद्दल सांगितले. (Village ban on state leaders Chhagan Bhujbal said punishment under 19 articles of the constitution Manoj Jarang Patil OBC Mahaelgar Sabha Hingoli)

हेही वाचा – OBC Reservation : छगन भुजबळांनी शरद पवार यांचे मानले आभार; पण का?

- Advertisement -

मनोज जरांगेंवर हल्लाबोल करताना छगन भुजबळ म्हणाले की, तो (मनोज जरांगे पाटील) आमची लायकी काढतो, परंतु छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्रत्येक मावळा लढला. महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधून काढली. शिवजयंती फुलेंनी सुरू केली. शाहीर अमर शेख यांनी दुसरा पोवाडा रचला, अण्णाभाऊ साठे यांनी तिसरा पोवाडा रचला. पेशवाईला लोळवणारे महार सैनिक होते. कपडे शिंपी शिवतो, तुमची शेतीची अवजारे सुतार बनवतो. वडार दगडावर घाव घालून पाटा वरवंटा तयार करतो, चप्पल चर्मकार बांधवांनी तयारी केली, घर बलुतेदारांनी बांधली, असे असतानाही आज आमची लायकी काढली जाते, अशा शब्दात छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला.

गावबंदी केल्यावर संविधानानुसार 1 महिन्याची शिक्षा

मागासवर्गीयांच्या हाताखाली कसं काम करायचे, उपनिरिक्षक मराठा समाजाचा, एसपी मागासवर्गीय त्याने आता उपनिरिक्षकाला सलाम ठोकायचा. आमची लायकी नाही. हे तुम्ही शिकवत आहात, परंतु त्यावर बोलायला कुणी तयार नाही. यांनी गावबंदी, गावागावांत बंदी केली. एकालाही गावात सोडत नाहीत. आमदार नारायण कुचे, रावसाहेब पाटील दानवे या सगळ्यांना गावबंदी करणार, परंतु रोहित पवार, राजेश टोपे आले तर त्यांचे स्वागत करणार, असा आरोप करताना छगन भुजबळ यांनी गावबंदी केल्यावर संविधानानुसार 1 महिन्याची शिक्षा असते, अशी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संविधानातील 19 कलम काय सांगतो की, कुणालाही गावबंदी करता येणार नाही, त्यामुळे काढा बोर्ड आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना 1 महिन्याच्या शिक्षेवर पाठवा. सरकार, पोलीस करणार आहे की नाही? असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – माझ्या नादी लागू नका, प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर भुजबळांची विनंती; म्हणाले…

यावेळी ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री आ. महादेव जानकर खासदार रामदास तडस, ओबीसी महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे, भटक्या विमुक्तांचे नेते प्रा. लक्ष्मण गायकवाड, आमदार राजेश राठोड, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, मुस्लिम ओबीसी संघाचे शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. बी. डी. चव्हाण, माजी आमदार रामराव वडकुते, प्रकाश राठोड, ॲड. सचिन नाईक, यांच्यासह सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाज व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी व ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -