घरक्राइमड्रग्जप्रकरण : चेन्नई तुरुंगात केरळच्या आरोपीची अन् फरार आरोपीची झाली ओळख

ड्रग्जप्रकरण : चेन्नई तुरुंगात केरळच्या आरोपीची अन् फरार आरोपीची झाली ओळख

Subscribe

एमडी ड्रग्जप्रकरणात नाशिक पोलिसांनी थेट केरळमधून अटक केलेल्या एका आरोपीची फरार आरोपीशी चेन्नई तुरुंगात ओळख झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. केरळच्या आरोपीने हैदराबाद येथून रसायने खरेदी करुन ड्रग्जमाफिया सनी पगारेच्या सोलापूर येथील एमडीच्या कारखान्यात पाठवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मोहम्मद अरजास एम. टी (रा. कोझिकोडा, केरळ) असे संशयिताचे नाव आहे.

फरार आरोपीला अटक झाल्यावरच तो आणि सनी पगारे कसे संपर्कात आले हे उघड होणार आहे. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणान्वये शोध सुरु केल्याचे तपासी अधिकारी हेमंत फड यांनी सांगितले.

- Advertisement -

पोलिसांनी नाशिकच्या सामनगाव एमडी तस्करीच्या तपासादरम्यान सोलापुरात नशेचा कारखाना व गोदाम उद्ध्वस्त केला. सोलापुरापर्यंत कारखाने असल्याचे उघड झाल्यावर टोळीला बेड्या ठोकल्या. दोन महिन्यांपासून नाशिक पोलीस आयुक्तालतील एनडीपीएस पोलीस ड्रग्जच्या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत. मुंबई-पुणे-नाशिक पोलिसांच्या तपासात पहिल्यांदा परराज्यातील संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहायक निरीक्षक हेमंत फड व हेमंत नागरे यांचे पथक सखोल चौकशी करीत असताना केरळ राज्यात धागेदोरे असल्याचे समोर आले. त्यानुसार सहायक निरीक्षक फड व गुंडा विरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते त्यांच्या पथकासह केरळमध्ये गेले. पथकाने दिवसरात्र संशयित मोहम्मदला अटक केली. संशयित मोहम्मद याने केरळमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे एक कंपनी स्थापन केली. हैदराबादेतून रसायनची खरेदी करुन तो सनी पगारेच्या सोलापूर येथील एमडीच्या कारखान्यात पाठवायचा, असे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. ड्रग्जप्रकरणात आरोपी राज्याबाहेरील असल्याने आता गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -