घरमहाराष्ट्रशिवसेना नेते अनिल परब यांना ईडीचे समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीचे समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Subscribe

शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने समन्स पाठवला आहे. चौकशीसाठी हजर हाण्याचे आदेश अनिल परब यांना देण्यात आले आहेत. विधानपरिषद निवडणूक लागली असताना पुन्हा ईडीकडून (ED) समन्स पाठविण्यात आला आहे. ईडीने दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांना समन्स बजावला आहे.

आधीही बजावली होती नोटीस –

- Advertisement -

ईडीने परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली होती. चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, परब यांचा एक पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे जाऊ शकले नव्हते. त्याच्याही आधी परब चौकशीला सामोरे गेले होते. मात्र, दुसऱ्या चौकशीवेळी ते उपस्थित राहणार नाहीत हे त्यांचे वकील ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळत होती.

100 कोटी वसुली प्रकरणात नोटीस –

- Advertisement -

याआधी परब यांना ईडीने 31 ऑगस्टला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी ईडीने परब यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात समन्स बजावला होता.

या प्रकरणी समन्स –

दोन नोटीस परब यांना दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी ईडीने पाठवली आहे. तर त्यांनी दोन्ही वेळा हजर राहण्याचे सांगितले होते. मात्र, मागच्यावेळी ते गैर हजर राहीले होते. त्यामुळे ईडीने परब यांना पुन्हा समन्स बजावला आहे. त्यामुळे परब उद्या चौकशीला हजर राहतात का हे पहावे लागेल.

काय आहे प्रकरण –

अनेक दिवासांपासून याच रिसॉर्टवरून अनिल परब यांच्यावर अनेक आरोप भाजपकडूनही केले जात आहेत. साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणाची ईडीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली होती. ईडीकडून सर्च ऑपरेशनमध्ये अनेक कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -