घरताज्या घडामोडीभाजपला विजयाचा प्रसाद तर मविआचा चंद्र मावळला

भाजपला विजयाचा प्रसाद तर मविआचा चंद्र मावळला

Subscribe

विधान परिषदेच्या अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव होईल असे दिसत असताना नाट्यमय घडामोडीत काँगेसच्या चंद्रकांत हांडोरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

राज्यसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्यानंतर महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत काळजीपूर्वक पाऊल टाकल्याचे दिसत होते मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने याही निवडणुकीत अंकगणिताचा योग्य मेळ बसवत विजय संपादन केला आहे. भाजपाला पहिल्या पसंतीची तब्बल १३३ मत मिळाली आहे. मविआची जवळपास तब्बल २० फुटल्याचे यातून स्पष्ट होत आहे. हा एकूणच महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. या निकालाचा राज्याच्या एकूणच राजकारणावर दूरगामी परिणाम होणार हे मात्र नक्की !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -