घरठाणेEknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे धावले ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णाच्या मदतीसाठी

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे धावले ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णाच्या मदतीसाठी

Subscribe

 

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आज पहायला मिळाला. गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली.

- Advertisement -

यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे त्याना समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार दिल्याने त्याला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

हेही वाचाःSharad Pawar : गडी काय हे तू पाहिलंच नाही; वयाच्या टीकेवर शरद पवारांचा अजितदादांना टोला

- Advertisement -

अखेर क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच त्याला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली. मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेने मदत केलेली पाहुन सोनवणे यांच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानिमित्ताने त्यांच्या संवेदनशील स्वभाव पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाला आहे.

आमचे त्रिशूळ पूर्ण झाले

अजित पवार सोबत आल्याने आमचे त्रिशूळ पूर्ण झाले आहे. हे आमचे विकासाचे त्रिशूळ आहे. आमचे त्रिशूळ राज्यातील गरीबी दूर करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे व्यक्त केला. गडचिरोली येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. अजित पवार हे आमचे जूने मित्र आणि सहकारी आहेत. ते सोबत आल्याने आमचे त्रिशूळ पूर्ण झाले आहे. आमचे त्रिशूळ नक्कीच महाराष्ट्राचा विकास करेल, गडचिरोलीचा विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना रिक्षा आणि ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले, गडचिरोलीतून कच्चा माल बाहेर जातोय हे चित्र बदलून येथे कारखानदार यायला हवेत. त्यासाठी नक्कीच सरकार सहकार्य करेल. छत्तीसगड, ओडिशा व झारखंड येथे पोलाद आणि स्टीलची इंडस्ट्री उभी राहिली आहे. अशीच इंडस्ट्री गडचिरोलीत उभी रहावी असे आमचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण झाल्यास गडचिरोलीत रोजगार उपलब्ध होईल. येथे मायनिंग ब्लॉक आहेत. उद्योजक येथे येण्यास इच्छूक आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -