घरमहाराष्ट्रपदपथांवर अतिक्रमण, नागरिकांचा जीव मुठीत

पदपथांवर अतिक्रमण, नागरिकांचा जीव मुठीत

Subscribe

वार्ताहर:- नागरिकांना सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेने चालता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांच्या कडेला पदपथ करण्यात आले आहेत. मात्र महामेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यांवरील पदपथांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यातच मेट्रोच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्समुळे रस्ते अरुंद झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे. महामेट्रोकडून शहरात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. या मेट्रो कॉरिडॉरमध्ये कर्वे रोड, शिवाजीनगर, आरटीओ रोड परिसरात महामेट्रोकडून पदपथांची रुंदी कमी करण्यात आली आहे. त्यावर बांधकाम साहित्य टाकून अडथळा निर्माण करण्यात आला आहे. मेट्रोच्या कामामुळे एकीकडे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे पदपथांवर अतिक्रमण केल्याने नागरिकांचे चालणे कठीण झाले आहे. कर्वे रोड परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहेत. त्यातच मेट्रोकडून पदपथांवर काही ठिकाणी बॅरीकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच मेट्रोचे बांधकाम साहित्य नित्यनियमाने पदपथांवर टाकण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -