घरमुंबईअवनीच्या हत्येविरोधात शिवाजीपार्कमध्ये ग्लोबल मार्च

अवनीच्या हत्येविरोधात शिवाजीपार्कमध्ये ग्लोबल मार्च

Subscribe

प्रतिनिधी:- टी-१ म्हणजेच अवनी या वाघिणीला गोळ्या घालण्यात आल्याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मुंबईतील विविध संस्थांनी काल शिवाजीपार्कमध्ये ग्लोबल मार्च काढला. अवनीला ठार मारण्याऐवजी तिला जिवंत पकडण्यात वन विभागाने स्वारस्य न दाखवल्याचा निषेध करताना संघटनांनी वनमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.माजी खासदार प्रिया दत्त यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी या धरण्यात सामील झाले होते. वाघिणीला ठार मारण्याच्या कृतीचा निषेध करताना उपस्थितांनी वनविभाग, वनमंत्री आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय पूर्णत: असमर्थनीय असल्याचा आक्षेप उपस्थितांनी घेतला. अवनीला जेरबंद करून पकडणे शक्य असूनसुद्धा तसे न करता, तिला अवैधरित्या शिकार्‍यांकरवी मारण्यात आल्याबद्दल उपस्थितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. ज्यांनी हा उद्योग केला त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही उपस्थितांनी केली.प्राणीप्रेमी संघटना आणि सामाजिक संस्थांतर्फे ’ग्लोबल मार्च’ काढण्यात आला होता. अनेक संघटनांचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अवनीच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करताना प्राणीप्रेमींनी वनविभागाने जबाबदारीतून पळ काढल्याचा आरोप केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -