घरमहाराष्ट्रमित्रांच्या चिडवण्यावरून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मित्रांच्या चिडवण्यावरून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Subscribe

इंजिनिअरिंगच्या एका विषयात नापास झाल्याने मित्र चिडवायचे म्हणून पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. शुभम भोसले (२१) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाला शिकत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा धायरी परिसरात राहण्यास होता. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. वडिलांसोबत तो ही सुरक्षारक्षकाचे काम करत होता. यावर्षी तो एका विषयात नापास झाला होता. यावरून त्याचे मित्र त्याला चिडवत होते. याला वैतागूनच शुभम याने आत्महत्या केल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

- Advertisement -

शुभम ४ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. काल सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह रायकर मळा परिसरातील एका टेकडीच्या पायथ्याशी आढळला. त्यांनी टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -