घरमहाराष्ट्रविरोधी पक्ष विस्कळीत, भाजपच्या तानाशाही विरोधात सर्वांनी एकत्र यावं - संजय राऊत

विरोधी पक्ष विस्कळीत, भाजपच्या तानाशाही विरोधात सर्वांनी एकत्र यावं – संजय राऊत

Subscribe

यूपीएच्या नेतृत्वासाठी पवारांचा विचार होऊ शकतो

देशात सध्या भाजपची तानाशाही सुरू आहे. या तानाशाहीविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांनी केले आहे. सध्याच्या स्थितीत या देशात विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तीस दिवसांपासून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यांना कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. त्यांच्या प्रश्नांची खिल्ली उडवली जात आहे. दुसरीकडे विरोधीपक्ष विस्कळीत आहे. सध्याच्या स्थितीत या देशात विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. भाजपच्या या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी यूपीएची ताकद वाढवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, जिथे विरोधी पक्षाची सत्ता आहे. तिथे केंद्राच्या दबावाखाली, दहशतीखाली काम करू दिलं जात नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकार चालवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. केंद्राचं अजिबात पाठबळ मिळत नाही. विकास करायला गेला तर खो घातला जात आहे. मेट्रो हे त्याचं उदाहरण आहे. महाराष्ट्रात मेट्रो सारखे प्रकल्प होऊ नये यासाठी यंत्रणा काम करत आहे. पश्चिम बंगालमध्ये वेगळं राजकारण सुरू आहे. जे विरोधी पक्षात आहेत. त्यांनी एकत्र येऊन मजबूत संघटन तयार करणे गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

यूपीएच्या नेतृत्वासाठी पवारांचा विचार होऊ शकतो

यूपीएमध्ये सोनिया गांधींकडे नेतृत्व आहे. मात्र आता यूपीएची ताकद वाढणे गरजेचं आहे. यूपीएचं नेतृत्व कोण करू शकतं? असा सवाल राऊत यांना विचारला असता त्यावर त्यांनी थेट भाष्य केलं. या देशात नेत्यांची कमी नाही. झाडाला एक दगड मारले तर राष्ट्रीय स्तरावरचे सतरा नेते पडतील. एकेकाळी सर्वजण सोनिया गांधींच्या नेतृत्वात एकत्र आले होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातही आले होते. देशात सोनिया गांधींच्याबरोबरीने शरद पवार हे सर्वांची मान्यता असलेले नेते आहेत. पवारही मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, असं राऊतांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा – एकजण म्हणतात मी परत येईन अन् दुसरे म्हणतात परत जाईन’; अजित पवारांची फटकेबाजी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -