घरमहाराष्ट्रअक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर भाविकांसाठी पुन्हा बंद

अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर भाविकांसाठी पुन्हा बंद

Subscribe

गर्दीमुळे कोरोनाचा संसर्क वाढू नये यासाठी ही खबरदारी बाळगण्यात आली आहे. भाविकांना मंदिरात येऊ नका असे आवाहन सोलापूरच्या अक्कलकोट मंदिराकडून करण्यात आले आहे.

सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यामुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे मंदिर पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वामी समर्थांचे मंदिर २ जानेवारी पर्यत बंद राहणार आहे. वर्षाअखेरिस मिळालेल्या सलग सुट्यांमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. सलग सुट्यांमुळे अक्कलकोट मंदिरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन २ जानेवारीपर्यंत बंद असणार आहे.

अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्क वाढू नये यासाठी ही खबरदारी बाळगण्यात आली आहे. भाविकांना मंदिरात येऊ नका असे आवाहन सोलापूरच्या अक्कलकोट मंदिराकडून करण्यात आले आहे. स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मंदिरात दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जात असतात. स्वामींचे दर्शन घेऊन भाविक नवीन वर्षाची सुरूवात करतात.  मात्र आता २५ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत मंदिर बंद असणार आहे.

- Advertisement -

२४ डिसेंबरच्या रात्रीपासूनच अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर बंद करण्यात आले. नाताळच्या सलग तीन दिवस सुट्या आल्याने पर्यटकांनी पर्यटनस्थळी मोठी गर्दी केली आहे.  मुंबई, पुणे, नाशिक,नागपूर, कोल्हापूर यासांरख्या भागातून पर्यटकांनी कोकण,अलिबाग, माथेरान या भागात मोठी गर्दी केली आहे. शिर्डी, अक्कलकोट यासांरख्या धार्मिक स्थळांना भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही वाहनांच्या लांबच लांब रांग्या पहायला मिळत आहेत.


हेही वाचा – सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणात

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -