घरCORONA UPDATEज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनाने निधन

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनाने निधन

Subscribe

सहकार क्षेत्रातील नेता काळाच्या पडद्याआड

पंढरपूरमधील दिग्गज नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन झाले. सुधाकरपंत परिचारक यांनी काल रात्री साडे अकराच्या सुमारास पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुधाकरपंत परिचारक गेले 2 दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे सर्व अंत्यविधी कोरोनाच्या नियमावलीत पुणे येथे पार पडतील, अशी माहिती नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवरुन दिली आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सुधाकरपंत परिचारक यांनी २५ वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती. तर दिर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे कायमच त्यांना संबोधले गेले. काँग्रेसमध्ये स्व. वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. २०१९ ची विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

- Advertisement -

गेली ५० वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे, अशी भावनिक पोस्ट प्रितीश परिचारक यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. “तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यामुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे,” असे ते म्हणाले होते. दरम्यान, काल सुधाकरपंत परिचारक यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांचे सर्व अंत्यविधी कोरोनाच्या नियमावलीत पुणे येथे पार पडतील.

नमस्कार, आपल्या सर्वांचे आधार, ज्येष्ठ नेते, माजी आमदार आदरणीय श्री सुधाकर पंत परिचारक यांचे काल…

Posted by Pritish Prashant Paricharak on Monday, 17 August 2020

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -