घरक्राइमखरेंचे खोटे कारनामे : पर्दाफाश! ऑडिओ क्लिपमुळे जिल्हा बँकेतील अपहार चव्हाट्यावर; काय...

खरेंचे खोटे कारनामे : पर्दाफाश! ऑडिओ क्लिपमुळे जिल्हा बँकेतील अपहार चव्हाट्यावर; काय आहे क्लिपमध्ये?

Subscribe

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांचा निधीच्या अपहाराचा सबळ पुरावा असलेल्या ऑडिओ क्लिप ‘माय महानगर’च्या हाती लागल्या आहेत. यातील संभाषणामुळे व्हाईट कॉलर बँक माफियांचा बुरखा फाटला आहे. या क्लिपमध्ये पैशांची ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करण्यासाठी वाय. के. पाटील आणि शैलेश पिंगळे यांची कशी कसरत सुरू आहे, त्यांच्या संभाषणावरुन सर्व सामान्यांचा पैसा कशा पद्धतीने लंपास झाला, हे स्पष्ट होते. त्यामुळे प्रशासनाला कारवाईसाठी आणखी किती पुरावे हवे आहेत, आतातरी या माफियांवर कारवाई होणार का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
ऑडिओ क्लिपमुळे लाचखोर खरेचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला असून, सहकार मंत्रालयाकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना सतीश खरे याने गटसचिवांना बेकायदेशीरपणे प्रोत्साहन निधी देण्याचा घाट घातला. यात प्रत्येक गटसचिवाला 70 हजार याप्रमाणे पगाराव्यतिरिक्त प्रोत्साहन निधी देण्याचा बनाव करत गटसचिवांना धनादेश देण्यात आले. हे सर्व धनादेश गटसचिव देविदास नाडे व विलास पेखळे यांनी एकत्र करुन दिंडोरी, कळवण व देवळा शाखेतून एकाचवेळी कॅश केले. यात काही समर्थक गटसचिवांना 20 हजार तर काहींना 5 हजार देण्यात आले. उर्वरित रकमा काही संचालक व अधिाकार्‍यांनी खिशात घातल्या. हे प्रकरण अत्यंत गंभीर असताना बँकेकडून मात्र कारवाईसाठी चालढकल सुरू आहे. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनच्या माध्यमातून गटसचिवांच्या निधीतील अपहाराबाबत तक्रारी केल्या आहेत. स्वत: अण्णा हजारे या विषयात सक्रिय सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

संचालकांच्या इशार्‍यावर सारेकाही 

जिल्हा बँकेत ११ हजार ठेवीदार आहेत. बँकेच्या माजी संचालकांमुळे बँक पूर्णत: डबघाईस आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हे संचालकांच्या इशार्‍यावर नाचतात.

यांची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल

गटसचिवांच्या प्रोत्साहन निधीसाठी तात्कालीन अध्यक्ष केदा आहेर यांचे स्वीय सहायक वाय. के. पाटील यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावल्याचे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. गटसचिवांच्या पैशांची जमवाजमव करण्याची जबाबदारी वाय. के. पाटील यांच्यावर होती का, असा सवाल उपस्थित होत असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाय. के. पाटील हे पीए असतानासुद्धा प्रशासकीय कामात त्यांनी अनेकदा ढवळाढवळ केल्याचे बोलले जाते. थेट अध्यक्षांचेच पीए असल्याने कर्मचारी व अधिकारी त्यांना घाबरून असत. याचाच फायदा घेत त्यांनी गटसचिवांच्या नावाने पैसा जमा केला. पैशांसंदर्भातील त्यांची क्लिप बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

खरेने दडपले प्रकरण

गटसचिवांकडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधकांनी दिलेले असताना त्यांच्याविरुद्ध अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. काही गटसचिवांना अत्यंत तुटपुंजी रक्कम मिळाली, तर काहींना मिळालीच नाही. गटसचिवांवर दबाव टाकल्यास या प्रकरणाचे पितळ उघडे पडेल म्हणून लाचखोर सतीश खरे याने हे प्रकरण दडपून ठेवल्याचे दिसून येत आहे.

बँकेत अनेक गैरव्यवहार होत असून, कोट्यवधींचा अपहार झाला आहे. याप्रकरणी बँकेकडून कुठलीही माहिती मिळत नाही. त्यामुळे बँकेतील अनेक गैरव्यवहार दडपले जात असून, बँकेच्या भवितव्यासाठी हे घातक आहे. गटसचिव निधीच्या अपहार प्रकरणात दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. : भास्कर झाल्टे, सचिव, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, नांदगाव

ऑडिओ ऐकण्यासाठी क्यू-आर कोड करा स्कॅन
एनडीसीसी बँकेतील गटसचिवांच्या निधीचा अपहाराचा सबळ पुरावा असलेली ऑडिओ क्लिप माय महानगरच्या हाती लागली आहे. ही क्लिप ऐकण्यासाठी बाजूचा कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा

https://fb.watch/kP7J9lW_28/

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -