घरमहाराष्ट्रराष्ट्रीय महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

राष्ट्रीय महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

Subscribe

रस्ते वाहतुक मंत्रालयाच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या सुरत-हैद्राबाद राष्ट्रीय द्रुतगती ६ पदरी महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. बहुतांश गावांमधील शेतकऱ्यांचा या जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतुक मंत्रालयाच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या सुरत-हैद्राबाद राष्ट्रीय द्रुतगती ६ पदरी महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर,राहाता,राहुरी व नगर तालुक्यातील एकूण २९ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे या कामासाठी संपादन केले जाणार आहे. दरम्यान बहुतांश गावांमधील शेतकऱ्यांचा या जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही गावांमध्ये सर्वेक्षणासाठी आलेल्या संबंधित ठेकेदार एजन्सी च्या लोकांना शेतकर्यांनी अक्षरश: गावांमधून हाकलून लावले आहे.

हैद्राबादच्या कपंनीची निवड

सुरत-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गा ६ पदरी बनविण्याचे नियोजन आहे. हैद्राबादच्या आर.व्ही.असोसिएट या कंपनीची निवड या कामासाठी केली गेली आहे. उपग्रहाव्दारे सर्वेक्षणाचे काम झाल्यानंतर आता रस्त्याचे प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर,राहाता,राहुरी व नगर तालुक्यातील २९ गावांमधून सुरत-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाचे तब्बल १०६ किलोमीटर अंतर असणार आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

या महामार्गासाठी अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी,विहिरी,कूपनलिका घरांची पक्की बांधकामे यांचे भूसंपादन केले जाणार आहे.त्यामुळे या रस्त्याच्या कामा बाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसत आहे. त्या मुळे काही गावांमध्ये संतप्त शेतकर्यांनी सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी गावात आलेल्या संबंधित ठेकेदार कंपनीच्या लोकांना अक्षरश: हाकलून लावले आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण

सुरत हैद्राबाद महामार्ग नाशिक जिल्ह्यातून संगमनेर तालुक्यातील गावांमधून नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असून राहाता,राहुरी व नगर तालुक्यातील गावांमधून जाऊन हा महामार्ग पुढे सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील ७,राहाता तालुक्यातील २,राहुरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १२ गावे व नगर तालुक्यातील ८ अशा एकूण २९ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -