घरमहाराष्ट्रयेवल्यात दुष्काळ जाहीर करा; तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र

येवल्यात दुष्काळ जाहीर करा; तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र

Subscribe

येवला तालुक्यातील नगरसुल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहून पत्र पाठवले आहे. येवला तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यात करावा अशी मागणी या पत्राद्वारे त्यांनी केली आहे.

राज्यामध्ये सध्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८० तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. मात्र या यादीमध्ये येवला तालुक्याचा समावेश नसल्याने येवल्यातील गावकरी नाराज झाले आहेत. येवला तालुक्यातील नगरसुल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहून पत्र पाठवले आहे. येवला तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यात करावा अशी मागणी या पत्राद्वारे त्यांनी केली आहे.

स्वत:च्या रक्ताने लिहिले पत्र

सध्या निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. त्यामुळे शेतीकरी चिंतेत आला आहे. पाण्याअभावी शेतातील पीक करपत आहे, पिकांसाठी केला खर्च वाया गेला आहे, शेतीसाठी खर्च केलेले पैसे मिळत नाही यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे राज्यातील १८० तालुक्यात सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. परंतू दुष्काळाची झळ बसलेल्या येवला तालुक्याचा यात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे नगरसुल येथील तरुण शेतकरी कृष्णो डोंगरे याने येवला तालुक्यात दुष्काळ घोषीत करावा, शेतकरी कर्जावर विज बिल सक्तीची वसुली थांबवण्याची मागणीसाठी स्वत:चे रक्त काढून त्याच रक्ताने कृष्णा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाठवले आहे.

- Advertisement -

शेतकरी अडचणीत

येवला तालुक्यातील पाणी प्रश्न किती भीषण आहे. अनेक गावामद्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. रब्बी हंगाम ८० टक्के वाया गेला असून जलस्त्रोत साठे गेल्या दोन ते तीन वर्षापासून कोरडे पडले आहेत. त्यामुळे चारा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. या सर्वांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ट्रॅफिक सिग्नलवर फिरण्यापेक्षा शेतीच्या बांधावर येऊन परिस्थिती जाणून घ्यावी असे कृष्णा यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -