घरमहाराष्ट्रदहावी आणि बारावी परीक्षा शुल्काचे चलन ऑनलाईन तयार होणार

दहावी आणि बारावी परीक्षा शुल्काचे चलन ऑनलाईन तयार होणार

Subscribe

चलन विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करावयाचे असून ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे जमा करावयाचे आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनालाईन पध्दतीने सादर केल्यानंतर परीक्षा शुल्काचे एचडीएफसी बॅंकेचे चलन ऑनलाईन तयार होणार आहे. हे चलन विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करावयाचे असून ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे जमा करावयाचे आहे. यापूर्वी परीक्षा शुल्क प्रचलित पध्दतीने बँक ऑफ इंडियामध्ये न भरता ते भरणा करण्याबाबतची कार्यवाही बदलण्यात आली आहे. मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे.

रक्कमेबाबत सुधारीत पध्दतीप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन

ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम दिलेल्या मुदतीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी त्यांच्या बँकेच्या खात्यामधून NEFT/RTGS द्वारे चलनावरील नमूद २१ अंकी बँक अकाऊंट आणि आयएफएससी कोडप्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे. चलनावरील आयएफएससी कोड हा HDFC0000007 असा आहे. परीक्षा शुल्काच्या रक्कमेबाबत सुधारीत पध्दतीप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव शरद खंडागळे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आयटीआय विद्यार्थी दहावी आणि बारावी समकक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -