घरमहाराष्ट्रSharad Pawar : शेतकऱ्यांचं उत्पन्न अजूनही दुप्पट झालेलं नाही; शरद पवारांनी मोदी...

Sharad Pawar : शेतकऱ्यांचं उत्पन्न अजूनही दुप्पट झालेलं नाही; शरद पवारांनी मोदी सरकारवर डागले टीकास्त्र

Subscribe

बारामती : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचार सभांचा धडाका सध्या बारामती मतदार संघात सुरू आहे. आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. (Farmers income has not doubled yet Sharad Pawar criticized the Modi government)

हेही वाचा – Mahayuti : माझ्या विजयाची माझ्यासकट जनतेला 100 टक्के खात्री; अढळराव पाटलांचा दावा

- Advertisement -

शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाची आणि राज्याची सत्ता कुणाच्या हातात द्यायची, हा आपल्यासमोर मोठा प्रश्न आहे. देशात सध्या भाजपाची सत्ता आहे. सत्तेचा वापर करून बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना घटनेच्या आधारावर मुलभूत अधिकार दिला. त्या संविधानावर आणि मुलभूत अधिकारावर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यावर तुम्हाला जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन शरद पवारांनी नागरीकांना केले.

मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाही. कारण सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. आज 2024 सुरू आहे, पण अजूनही उत्पन्न दुप्पट झालेल नाही, असे म्हणत शरद पवार यांनी यावेळी कांद्याच्या भावासंदर्भात किस्साही सांगितला. ते म्हणाले की, माझ्याकडे त्यावेळेला शेतीचा खात्याचं काम होतं. आम्ही कांदा परदेशात पाठवला. त्याचा परिणाम असा झाला की, कांद्याचे भाव वाढले. कांद्याचे भाव वाढल्यानंतर पार्लमेंटमध्ये भाजपावाले कांद्याच्या माळा घालून आले आणि ”शरद पवार होश में आओ, प्याज किंमत निचे लाओ…” असे म्हणायला लागले. त्यांनी अरक्षश: दंगा केला. त्यानंतर मला भाव खाली आणण्याबाबत खुलासा करण्यास सांगितले.  मात्र मी कृषिमंत्री असेपर्यंत कांद्याचे भाव खाली येऊ देणार नाही. तुम्ही गळ्यात कांद्याच्या माळा घाला की कवड्याच्या माळा घाला, आमचे धोरण बदलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : बारामतीत धमक्या द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचंय; संजय राऊतांचा अजितदादांना इशारा

लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकून दडपशाही सुरू

केजरीवालांच्या अटकेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, संजय राऊत यांनी टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. केजरीवाल चमत्कारीक मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आदर्श शाळा, आदर्श दवाखाने काढले. मात्र आदर्श काम करून देखील केजरीवाल यांना तुरुंगात टाकले. त्यांचे निवडणुकीत 80 पैकी 78 नेते निवडुन आले. फक्त दोनच जागा भाजपाला मिळाल्या. 98 टक्के निकाल जनतेने केजरीवाल यांच्या बाजूने दिला. मात्र ते पंतप्रधान मोदींवर टीका करतात, म्हणून इतका लोकप्रिय मुख्यमंत्री तुरुंगात आहे. खरंतर लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकून दडपशाही सुरू आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -