घरताज्या घडामोडीSanjay Raut : बारामतीत धमक्या द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचंय; संजय राऊतांचा...

Sanjay Raut : बारामतीत धमक्या द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचंय; संजय राऊतांचा अजितदादांना इशारा

Subscribe

तुम्ही बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे. पुढे रस्ता आमचाच आहे, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला. इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी मेळावा पार पडला.

तुम्ही बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे. पुढे रस्ता आमचाच आहे, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला. इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. (sanjay raut slams dcm ajit pawar ncp on threat call in baramati pune)

मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची चर्चा सध्या बारामती सुरू आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांना इशारा दिला. “तुमचं अस्तित्व आता थोडचं आहे. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे. पुढे रस्ता आमचाच आहे. कोणला धमक्या देत आहेत. पवारांच्या माणसांना धमक्या देताय की शिवसैनिकाला धमक्या देताय. धमक्या देऊ नका आम्ही घाबरणारे नाहीत. ही मर्दांची सभा आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी अजितदादांना थेट इशाराच दिला.

- Advertisement -

शिवाय, “आम्हाला बाळासाहेब नेहमी सांगायचे की, लोकं उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका. पण आपण इथे एका विचाराने बसलेले आहात. एका भूमिकेतून बसलेले आहात. एक गोष्ट इथे स्पष्ट दिसतेय की, पाया खालची वाळी सरकली माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. माणूस घाबरला. त्याल पराभवाची भीती वाटायला लागली. लोकं आपल्याला स्वीकारणार नाहीत, याची भीती वाटायला लागली की, मग मोदीचा मार्ग सुरू होतो. म्हणजेच काय तर, धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. धमतक्या कशा देतात आम्हाला माहीत आहे. कारण आम्ही आयुष्यभर धमक्या देत आलो आहोत. आम्ही धमक्या देतोही आणि घेतोही. पण धमक्या वैगरेचा प्रकार या भागात जो सुरू आहे तो, डरपोक पणा आहे. धमक्या नेहमी आवाज बदलून दिल्या जातात, पण धमकी देणाऱ्यांची महाराष्ट्राला काळजी नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


हेही वाचा – NCP : महायुतीतील नेत्यांची पक्षांतर्गत अदलाबदली; शिरुरसाठी अढळराव 26 तारखेला राष्ट्रवादीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -