घरताज्या घडामोडीअहमदनगरमध्ये दाम्पत्याला विवस्त्र करून मारहाण, गुन्हा दाखल!

अहमदनगरमध्ये दाम्पत्याला विवस्त्र करून मारहाण, गुन्हा दाखल!

Subscribe

अहमदनगरमध्ये नवरा बायकोला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्काराचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी या दाम्पत्याच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले आणि अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशीरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. अहमदनगर तोफखाना पोलिसांनी या प्रकरणात कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर आरोपींनी पीडित दाम्पत्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर विवस्त्र करून केलेल्या मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल करू अशी धमकीही दिली. पीडित महिलेच्या नवऱ्याचं वीर्य काढून त्याच्याचविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, करु अशीही धमकी आरोपींनी दिल्याची माहिती पीडितांनी दिली आहे. यात पोलिसांचाही समावेश असल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केला आहे. त्यामुळे पीडितांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. पीडित पती-पत्नीने आरोपींना त्यांच्याविरोधात तक्रार करणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतरच आरोपींना पीडितांना सोडलं. मारहाणीचा हा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यात पीडितांना विवस्त्र करुन त्यांचे हात मागे बांधल्याचं दिसत आहे. तसेच त्याचं तोंडही बंद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विशेष म्हणजे पीडितांवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणत याआधीही हल्ले झाले आहेत. २४ जानेवारीला पीडित दाम्पत्य शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन घरी जात होते. तेव्हा त्यांचं रुग्णालयाच्या बाहेरुनच अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी एका बंदिस्त खोलीत विवस्त्र करण्यात आलं. त्यांच्याच कपड्यांच्या सहाय्याने त्यांना टांगून अमानुष मारहाण करण्यात आल्याचीही माहिती पीडितांनी दिली आहे.

काय घडलेलं २०१६ ला

अहमदनगमध्ये २०१६मध्ये पीडित विवाहितेवर सामुहीक बलात्कार झाला होता. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यात पोलिसांसह 6 आरोपींचा समावेश आहे. मात्र, 4 वर्षे होऊनही अद्याप या प्रकरणात आरोपपत्रही दाखल झालेले नाही. विशेष म्हणजे बलात्कारातील आरोपींनी जामिनाचाही प्रयत्न केला, मात्र वैद्यकीय अहवालामुळे त्यांना न्यायालयाकडून जामीन नाकारण्यात आला.

- Advertisement -

हे ही वाचा- नराधमांची फाशी पुन्हा टळली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -