घरदेश-विदेशनराधमांची फाशी पुन्हा टळली

नराधमांची फाशी पुन्हा टळली

Subscribe

निर्भया प्रकरण

देशाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी पुन्हा टळली आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. पुढील आदेशापर्यंत दोषींना फाशी देण्यात येणार नाही, असा निर्णय पटियाला कोर्टाने दिला आहे. त्यामुळे निर्भया दोषींची फाशी तिसर्‍यांदा टळली आहे. सुुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली होती. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पवनची दया याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीवर पटियाला कोर्टाने स्थगिती दिली आहे.

दोषी पवनने फाशीच्या शिक्षेला उशीर व्हावा या उद्देशाने शुक्रवारी सायंकाळी क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. यावर सुप्रीम कोर्टाने तात्काळ याचिका सुनावणीला घेत निकाली काढली. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून फाशीच्या अंमलबजावणीचा मार्ग जवळपास मोकळा केला होता.

- Advertisement -

मात्र पवनने 18 तासांपूर्वी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे दिल्लीच्या पटियाला कोर्टाने पुढील आदेशापर्यंत चारही आरोपींची फाशी स्थगित केली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 6 वाजता निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषींची फाशी टळली आहे.

फाशीला दोन वेळा स्थगिती
निर्भया बलात्कार प्रकरणाच्या 7 जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने चार आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानुसार या चौघांना 22 जानेवारीला फासावर लटकवले जाणार होते. दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर 17 जानेवारीच्या सुनावणीदरम्यान चारही आरोपींविरोधात नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले. या डेथ वॉरंटनुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली. जाईल, असा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला होता. मात्र 31 जानेवारीला निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -