घरदेश-विदेशभारतात करोना शिरकाव; पाच रूग्ण आढळले!

भारतात करोना शिरकाव; पाच रूग्ण आढळले!

Subscribe

दिल्ली, तेलंगणा, राजस्थान येथे तिघांना करोना व्हायरसची लागण झाली. त्यामुळे भारतात एकूण पाच करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना परदेशात जाण्यास बंदी केली आहे.

देशभरात करोनाची दहशत पसरली असून, भारतातही पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिल्ली, तेलंगणा आणि राजस्थान येथील तिघांना करोनाची लागण झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीन, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत जाण्यास बंदी केली आहे. याशिवाय भारताच्या शेजारचे देश बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांतही करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करोनाचे रूग्ण बाहेर जाणार नाहीत आणि त्यांना एकांतवासात वा रूग्णालयातच ठेवावे, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.

दुबईहून तेलंगणात आलेल्या तसेच सिंगापूरहून दिल्लीत आलेल्या अशा दोन भारतीयांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीतून समोर आले आहे. याशिवाय राजस्थानात आलेल्या इटालियन नारिकालाही संसर्ग झाला आहे. या सर्वांना रूग्णालयात नेले असून, त्यांच्या औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. इटली आणि इराणमधून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्याचे आदेश विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत.

- Advertisement -

जगभरात करोनामुळे तीन हजार जणांचा मृत्यू

आतापर्यंत या आजाराने तीन हजार बळी घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील २९१२ मृत्यू चीनमधील असून, अन्य देशांत मरण पावलेल्यांची संख्या १५७ वर पोहोचली आहे. याशिवाय जगभरात करोनाच्या रूग्णांची संख्या ९० हजारांपर्यंत पोहोचली आहे. आता चीननंतर करोनाचे सर्वाधिक रूग्ण दक्षिण कोरिया व इराणमध्ये आढळून आले आहेत. कोरियात ५०० रूग्ण असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जवळपास ६० देशांतमध्ये करोनाचा शिरकाव

रशिया, जर्मनी, सौदी अरेबिया, फ्रान्स, इंडोनेशिया, ब्रिटन युरोपियन युनियन अशा किमान ६० देशांत करोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. त्यामुळे या देशांवर अनेक निर्बंध घालण्यात आले असून, तेथील जवळपास सर्व सार्वजनिक समारंभ, क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

भारतीय चित्रपटसृष्टीला करोनाचा फटका

अभिनेत्री दीपिका पदुकोन ही आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी पॅरिसला जाणार होती. परंतु पॅरिसमध्ये करोनाची लागण झाली असल्यामुळे तिने पॅरिसला जाणे टाळले. तसेच अनेक हिंदी चित्रपट निर्मात्यांनी देशाबाहेरील चित्रिकरण पुढे ढकलले आहे. कारण कलाकारांनी अन्य देशात जाण्यास नकार दिला आहे.

अमेरिकेत करोनाचे सहा बळी

यापूर्वी अमेरिकेत करोनाची लागण होऊन दोन बळी गेले होते. परंतु आता मृतांचा आकडा सहावर गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -