घरमहाराष्ट्रFire News : भिवंडीत वलपाडा परिसरात भंगारच्या गोदामाला आग, लाखो रुपयांचे नुकसान

Fire News : भिवंडीत वलपाडा परिसरात भंगारच्या गोदामाला आग, लाखो रुपयांचे नुकसान

Subscribe

भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात असलेल्या भंगारच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीच्या घटनेत चार गोदाम आणि चार दुकाने जळून खाक झाली आहेत.

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात असलेल्या भंगारच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीच्या घटनेत चार गोदाम आणि चार दुकाने जळून खाक झाली आहेत. तर काही दुचाकी वाहने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचे सांगण्यात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर काही क्षणातच अग्निशमन दलाने घटनास्थळी येत शर्थीचे प्रयत्न करत आग विजवली असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Fire broke out at a scrap warehouse in Valpada area of ​​Bhiwandi)

हेही वाचा… Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; विदर्भ, मराठवाड्याला गारपीटीचा फटका

- Advertisement -

वलपाडा परिसरात लागलेल्या या आगीत भंगार गोदाम, लाकडी प्लाउड दुकान, हॉटेल, पानटपरी, चहाचे दुकान जळून खाक झाले आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. मात्र, ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये चार भंगाराची गोदामे तसेच दुकान, हॉटेल जळून खाक झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आगीच्या बाजूलाच एक पेट्रोल पंप होते आणि या पेट्रोल पंपावर पेट्रोल ने भरलेले दोन टँकर देखील होते. परंतु, या आगीचे लोळ तिथे जाण्याआधीच ती विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु, या घटनेनंतर काही परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आग लवकरात लवकर आटोक्यात यावी यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या व त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीमध्ये अनेक वाहने देखील जळून खाक झाली आहेत. या घटनेच्या काही वेळातच घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल झाले होते. तसेच आगीची भीषणता लक्षात घेत त्यांच्याकडून वाहतुकीसाठीचा रस्ता बंद करण्यात आला होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाण्याची कमतरता भाषत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर तब्बल चार तासानंतर नियंत्रण मिळवल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -