घरमहाराष्ट्रनागपूरUnseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; विदर्भ, मराठवाड्याला गारपीटीचा फटका

Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; विदर्भ, मराठवाड्याला गारपीटीचा फटका

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे.

भंडारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसासह गारपीटीनेही झोडपून काढले आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांसमोपर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांमध्ये पावसाची शक्यता कायम असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Presence of unseasonal rain in the state; Vidarbha, Marathwada hit by hail)

हेही वाचा… ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदली का?

- Advertisement -

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल मंगळवारी (ता. 19 मार्च) सायंकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. साकोली तालुक्यात वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतातील मका, गहू, भात पीक यासह बागायती शेती आणि पालेभाज्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावलेली असल्याचे पाहायला मिळाले आहे. असे असतानाच काल झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तर, गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. हवामान विभागाकडून गोंदियाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने विदर्भात तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यात वर्तविली होती. हा अंदाज खरा ठरत असून मंगळवारी दुपारपासून गोंदिया जिल्ह्यात वादळी वारा सुरू होता. अखेर सायंकाळच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. या पावसाचा फटका गहू पिकांसह भाजीपाला पिकांना देखील बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

- Advertisement -

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीमध्ये काल मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गारपीटसह जोरदार पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत होता. एक दोन ठिकाणी किरकोळ गारपीटही झाली. मात्र पारशिवनी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह जोरदार गारपीटही झाली. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यात देखील वातावरणात अचानक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही भागात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होऊन अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तर, कोरपना तालुक्यात पावसासह गारपीट झाली आहे. हवामान विभागाने दोन दिवस जिल्ह्यातील वातावरण बदलाचे संकेत दिले होते. या पावसाचा मिर्ची पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -