घरताज्या घडामोडीजालना : प्रसिद्ध उद्योगपती राजेश नहार यांच्यावर गोळीबार

जालना : प्रसिद्ध उद्योगपती राजेश नहार यांच्यावर गोळीबार

Subscribe

परतूर येथील प्रसिद्ध उद्योगपती राजेश नहार यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली असून या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

जालना जिल्ह्यातील परतूर येथील प्रसिद्ध उद्योगपती राजेश नहार यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये उद्योगपती राजेश नहारे यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री जालना – वाटूर महामार्गावर पोखरी पाटी नजिक ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तपासाचे आदेश दिले आहेत. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर हेही उपस्थित होते.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री राजेश नहार हे वाहनातून जात होते. त्या दरम्यान, जालना – वाटूर महामार्गावर पोखरी पाटी नजिक ते आले असता त्यांच्यावर अज्ञातांनी अचानक गोळीबार केला. त्यात हल्ल्यात नहार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून या घटनेमुळे परतूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुणे : ४० लाखाच्या खंडणीसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -