घरताज्या घडामोडीअनुराग कश्यपचे मोदींना आव्हान; शिक्षण घेतलंय हे सिद्ध करा

अनुराग कश्यपचे मोदींना आव्हान; शिक्षण घेतलंय हे सिद्ध करा

Subscribe

देशात सुधारित नागरिकत्व कायदा आणि जेएनयू हिंसाचार विरोधात केंद्र सरकारवर टीका केली जातं आहे. तसंच सीएए आणि जेएनयू हिंसाचार विरोधात देशभरात आंदोलन करण्यात आली. यासर्व पार्श्वभूमीवर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांने मोदींच्या शिक्षणासंबंधी प्रश्न चिन्ह उपस्थित करून त्यांना शिक्षण घेतलंय हे सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. अनुराग कश्यपने ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

अनुरागने असं ट्विट केलं आहे की, ‘आजपासून सीएए कायदा लागू झाला. मोंदीना पहिलं म्हणावं तुमचे कागदपत्र, entire political science ची आपली पदवी दाखवा आणि तुमच्या वडिलांचे आणि खानदानाचे जन्म प्रमाणपत्र सगळ्या भारताला दाखवा. त्यानंतर आमच्याकडे मागणी करा’, अशी अनुरागने कश्यपने मोदींवर टीका केली आहे.

- Advertisement -

तसंच त्याने मोदींना आव्हान देत असं ट्विट केलं, ‘सीएए लागू करणारे पंतप्रधानांची entire political science ची पदवी मला पहिला बघायची आहे. मोदींनी शिक्षण घेतलंय हे सिद्ध करा. त्यानंतर बातचित करू.’

- Advertisement -

अनुराग कश्यप नेहमीचं मोदी सरकारच्या नीती आणि धोरणांवर विरोध करत असतो. जेएनयू प्रकरणानंतर आता अनुराग कश्यप आक्रमक पणे सरकारवर टीका करताना दिसत आहे. शुक्रवारपासून देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यात आला. त्यासंबधी अधिसूचना जारी करण्यात आली होती. याशिवाय जेएनयू हिंसाचार प्रकरणातील हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील ओळख पटली आहे. सोमवारपासून या विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – जेएनयू: हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची पटली ओळख


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -