घरमहाराष्ट्रकोल्हापूर, सांगली पुन्हा पुराच्या काठावर; राधानगरीचे पाच दरवाजे उघडले

कोल्हापूर, सांगली पुन्हा पुराच्या काठावर; राधानगरीचे पाच दरवाजे उघडले

Subscribe

धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासूनच्या विश्रांतीनंतर सोमवारी पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केले आहे. महाराष्ट्रासह मुंबईसह इतर ठिकाणी पडणाऱ्या पावसाने अक्षरश: महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. तसेच दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, कोल्हापुरात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पूरस्थितीतून सावरत असताना पुन्हा एकदा प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे. कोल्हापुरातील भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. तर ४२ बंधारे पाण्याखाली गेलेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी, वारणा आणि दूधगंगा धरण परिसरात पावसाचं प्रमाण वाढलं आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी पंचगंगेसह सर्व नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरतून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे. तर काळम्मावाडी धरणातून ६ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले असून जिल्ह्यातील १६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा होत आहे. महापुरानंतर अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या चार – पाच दिवसांपासून जोरदार पुनरागमन केले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस सुरु होता. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. शहरासह गगनबावडा, पन्हाळा, आजरा, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, चंदगड आदि तालुक्यांत तुलनेने पावसाचे प्रमाण वाढले आहे. सर्व नद्या पुन्हा ओसंडून वाहून लागल्या आहेत. तसेच धरणे आणि मध्यम प्रकल्प १०० टक्के यापूर्वीच भरले आहेत. त्यामुळे संलग्न नद्यांची पाणीपातळी वेगाने वाढत चाचली आहे. त्याचबरोबर राजाराम बंधऱ्याची पातळी २५ फुटांपर्यंत आहे. राधानगरीतून विसर्ग सुरु झाल्याने गुरुवारी पंचगंगेच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत कमी जास्त पाऊस पडत आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वात जास्त ८४.५० मि.मी. तर हातकणंगलेत सर्वात कमी २ मि.मी. पाऊस पडला आहे. दिवसभरात जिल्ह्यात २७६.७० मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी २२८५.८६ मिी.मी. तर गेल्या २४ तासांतील सरासरी २३.६ मि.मी. इतकी आहे.

तब्बल ४२ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, शिवगाव, राशिवडे, सरकारी कोगे आणि खडक कोगे, करंजफेण यासह एकूण ४२ बंधारे पाण्याखाली गेली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – वाहतूक पूर्वपदावर, तरी मुंबईकर बेहाल!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -