घरदेश-विदेश७४ व्या वर्षी महिलेने दिला जुळ्या बाळांना जन्म

७४ व्या वर्षी महिलेने दिला जुळ्या बाळांना जन्म

Subscribe

७४ व्या वर्षी यशस्वीरित्या प्रसूत होणारी मंग्याम्मा ही जगातील पहिलीच महिला ठरली

आंध्र प्रदेशात एका महिलेने वयाच्या ७४ व्या वर्षी एकाला नव्हे तर जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये घडली आहे. या महिलेचे नाव मंग्याम्मा असून ही महिला जगातील पहिली महिला आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये राहणाऱ्या मंग्याम्माने ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुरूवारी अहल्या रुग्णालयात दोन मुलांना जन्म दिला आहे. यावेळी, डॉक्टरांनी मंग्याम्मा आणि त्यांच्या बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले.

वयाच्या ७४ व्या वर्षी यशस्वीरित्या प्रसूत होणारी मंग्याम्मा ही जगातील पहिलीच महिला ठरली आहे. यापुर्वी हरियाणातील दलजिंदर कौर या ७० वर्षीय महिलेच्या नावाची नोंद होती. या महिलेने २०१६ मध्ये बाळाला याच तंत्रज्ञानाच्या आधारे जन्म दिला होता.

- Advertisement -

मंग्याम्मा यांच्याबद्दल…

पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नेलापर्तीपडू या गावात मंग्याम्मा राहतात. त्यांना मुलं नसल्याने त्याच्या पतीने मंग्याम्मा यांच्यासह गेल्या वर्षी ‘आयव्हीएफ’ तज्ज्ञांची भेट घेतली. त्यानंतर ही महिला गरोदर राहिली. तीन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची देखरेख करण्यात आली. यासह १० डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत होते.

- Advertisement -

गेल्या महिन्यांत मंग्याम्मा आणि त्यांच्या पतीने ‘सीमांतम’ हा पारंपरिक कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली होती. मात्र डॉक्टरांनी त्यांना थांबण्यास सांगितले. त्यानंतर प्रसूतीपूर्वी काही तास डॉक्टरांनीच नर्सिंग होमच्या आवारात हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रम हॉस्पिटलचे कर्मचारी, नातेवाइक आणि अन्य स्नेही उपस्थित होते. त्यानंतर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलेची प्रसूती झाल्यानंतर त्या सुखरूप होत्या. यानंतर त्याचे नातेवाईक खूप आनंदी झाले होते. यावेळी ‘मी खूप आनंदी आहे. परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली.’ अशा भावना व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -