घरमहाराष्ट्रशिंदे गटाच्याच पावलावर पाऊल, शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करण्याची...

शिंदे गटाच्याच पावलावर पाऊल, शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करण्याची अजित गटाची मागणी

Subscribe

मुंबई : शिवेसेनेनंतर (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2 जुलै रोजी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सध्या राज्यात शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर पुढील महिन्यात निकाल येण्याची शक्यता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट एकमेकांचे खासदार अपात्र करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटानेही त्यांच्या गटातील काही जणांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. (Following in the footsteps of the Shinde group the Ajit groups demand to cancel the parliamentary seats of 4 members of the Sharad Pawar group Vandana Chavan Fauzia Khan Srinivas Patil Faisal Mohammed)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सध्या हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे. गेल्याच महिन्यात सुप्रिया सुळे यांनी सुनिल तटकरे आणि त्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणारे पत्र लोकसभा, राज्यसभेत दिले होते. त्यानंतर आता अजित पवार गटानेही जोरदार प्रत्युत्तर देताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून त्यांच्या गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे केली आहे.

- Advertisement -

शरद पवार गटातील ‘या’ चार जणांची खासदारकी रद्द करा

अजित पवार गटाने वंदना चव्हाण व फौजिया खान यांचे राज्यसभेतील आणि श्रीनिवास पाटील व फैजल मोहम्मद यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र देणारे खासदार अमोल कोल्हे यांचे नावे वगळण्यात आले आहेत. अमोल कोल्हे यांनी सुरुवातीला आम्हाला पाठिंबा देणारे प्रतित्रापत्र दिले असल्याचा दावा अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी केला होता. मात्र नंतर ते शरद पवार गटासोबत गेल्याचे कोल्हे यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात दाखल केले आहे, यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली नसल्याचे तटकरे म्हणाले होते.

शिंदे गटाचाच पावलावर अजित पवार गटाने पाऊल

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नावं वगळली होती. तीच भूमिका आता अजित पवार गटानेही घेतली आहे. अजित पवार गटाने शरद पवार आणि सुप्रीया सुळे यांची नावं वगळली आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -