घरमहाराष्ट्रनाशिककमळाबाईच्या पदराखाली लपून शिंदे-अजित पवार गट निवडणूक लढवणार, संजय राऊत यांचा दावा

कमळाबाईच्या पदराखाली लपून शिंदे-अजित पवार गट निवडणूक लढवणार, संजय राऊत यांचा दावा

Subscribe

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ हे दोन्ही नेते एकमेकांवर आरक्षणाच्या मुद्यावर उघडपणे टीका करत आहे. कमळाबाईच्या पदराखाली लपून शिंदे-अजित पवार गटाला निवडणुका लढवाव्या लागतील, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांना भाजपाची ऑफर मिळाल्याचा दावावरून केली आहे.

छगन भुजबळांना भाजपाची ऑफर असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “माझ्या पक्क्या माहितीनुसार, अजित पवार आणि शिंदे गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार हे भविष्यात भाजपामध्ये प्रवेश करतील आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील. हे मी तुम्हाला आताच सांगत आहे. जर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळाला असला तरी त्यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर त्यांना कोणी मतदान करणार नाही आणि उद्या अजित पवार गटाला घड्याळ मिळाले, तर शरद पवार जिथे आहेत तिथे मतदान होणार आहे. त्यामुळे कमळाबाईला स्वीकारून, कमळाबाईच्या पदराखाली लपून शिंदे-अजित पवार गटाला निवडणुका लढवाव्या लागतील. यामुळे मनोज जरांगे पाटील जे बोलत आहे त्यात तथ्य आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे गटाच्याच पावलावर पाऊल, शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करण्याची अजित गटाची मागणी

भुजबळ येवल्यामधून लढले तर मराठा समाज त्यांच्याविरोधात जाईल आणि ते पुन्हा विधानसभेत दिसणार नाही, या शक्यता वर्तवली जाते. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “ज्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोडलेले आहे. ते बहुतेक सगळेच लोक पराभूत होतील, मी राज्यातील जनतेची मानसिकता पाहतोय की, त्या गदार लोकांना स्वीकार करण्याची मानसिकता आता नाही. आता लोक निवडणुकीची वाट पाहत आहे. तुम्ही बीएमसीच्या निवडणुका घेण्यास देखील तयार नाही. उद्या कदाचित तुम्ही लोकसभा किंवा विधानसभा देखील घेणार नाहीत, अशा प्रकारची हुकूमशाही सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे कोकणात घेणार ‘खळा बैठक’

उद्योग मंत्र्यांना माहिती नसणे

कोणताही उद्योग हा राज्याबाहेर गेलेला नाही, असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हटले आहे. यावर संजय राऊत म्हणाले, “आंतरराष्ट्रीय फाईनेन्स कुठे गेले, मुंबई क्रिकेटची पंढरी होती, हा एक उद्योग होता तो आता कुठे गेला. वेदांत फॉक्सकॉन, ड्रग पार्क, हिरे मार्केट हे सर्व उद्योग कुठे गेले. हे जर उद्योग मंत्र्यांना माहिती नसेल तर हे राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.

हेही वाचा – कार्यक्रमाला ‘आपल्या दारी’ नाव असले म्हणजे…, रोहित पवार यांचा राज्य सरकारला टोला

मुख्यमंत्री एवढे मजबूत नेते आहे की…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानमध्ये प्रचारासाठी केले आहे, या प्रश्नावर संजय राऊत यांनी मिश्किल टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी राजस्थानमध्ये जाऊन प्रचार करू द्या ना. पुढच्या वर्षी अमेरिकेची निवडणूक आहे. यानंतर युरोपातील सात राष्ट्रात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मला असे वाटते की, मुख्यमंत्री हे एवढे मजबूत नेते आहेत. मला वाटते की, अमेरिकेतील शिकागो भागात त्यांच्या सभा लावल्या जाणार आहेत. लवकरच फ्रान्सची निवडणूक आहे. तिथेही त्यांना बोलविले जाईल, अरे आधी राज्यात बीएमसीच्या निवडणुका घ्या. तिथे प्रचार करून दाखवा. पुण्याची पोटनिवडणूक घेण्यास तुम्ही तयार नाही आणि चालले मोठे जयपूरला”, अशी मिश्किल टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -