घरमहाराष्ट्रपक्षाची ताकद वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे कोकणात घेणार 'खळा बैठक'

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे कोकणात घेणार ‘खळा बैठक’

Subscribe

ठाकरे गटाचे वरळी विधानसभेचे आमदार आणि युवानेते आदित्य ठाकरे हे आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. काल (ता. 22 नोव्हेंबर) रात्रीच ते या दौऱ्यासाठी रवाना झाले असून ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी कोकणातील ह्या दौऱ्याला महत्त्व असल्याचे सांगण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष हे तयारीला लागले आहे. मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या बैठका घेण्याचे काम करण्यात येत आहे. तर आता लवकरच पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांकडे यासाठी जबाबदारी पण देण्यात येणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे वरळी विधानसभेचे आमदार आणि युवानेते आदित्य ठाकरे हे आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. काल (ता. 22 नोव्हेंबर) रात्रीच ते या दौऱ्यासाठी रवाना झाले असून ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी कोकणातील ह्या दौऱ्याला महत्त्व असल्याचे सांगण्यात आले आहे. या दौऱ्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे हे खळा बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात बैठका घेणार आहेत. (Aaditya Thackeray will hold a ‘Khala Baithak’ in Konkan to increase strength of party)

हेही वाचा – कार्यक्रमाला ‘आपल्या दारी’ नाव असले म्हणजे…, रोहित पवार यांचा राज्य सरकारला टोला

- Advertisement -

आदित्य ठाकरेंचा हा दौरा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या दृष्टीने असला तरी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. आदित्य ठाकरेंच्या या खळा बैठकीला सिंधुदुर्गातून सुरुवात झाली आहे. दोडामार्ग नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष लीना कुबल यांच्या निवासस्थानी पहिली खळा बैठक पार पडली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्थानिक समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांशी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. कोणतीही जाहीर सभा न घेता तळागाळातल्या कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे संवाद साधणार असल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला आणि खळा बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आज सिंधुदुर्गात आदित्य ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांच स्थानिक नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

गुरुवारी दोडामार्ग ते सावंतवाडी, सावंतवाडी ते कुडाळ, कुडाळ ते बांबार्डे, बांबार्डे ते कणकवली, कणकवली ते राजापूर, राजापूर ते करबुडे असा आदित्य ठाकरेंचा दौरा असेल. तर उद्या शुक्रवारी (ता. 24 नोव्हेंबर) चिपळूण ते खेड, खेड ते महाड, महाड ते नागोठणे असा दौरा करत ठीक ठिकाणी या खळा बैठका होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोकणात घरासमोर असणाऱ्या अंगणाला खळा असे म्हणतात. गावातील, घरातील किंवा वाडीतील कोणताही निर्णय असला तरी तो अंगणामध्ये म्हणजेच, खळ्यात बसून एकमुखी घेतला जातो. त्यामध्ये प्रत्येकाचे मत विचारात घेऊन निर्णय घेण्यात येत असतो. त्यामुळे या खळा बैठकीच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक व्यक्तीचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -