घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 'होयबा' करून आले; सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरे यांची टीका

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ‘होयबा’ करून आले; सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरे यांची टीका

Subscribe

मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे ट्विटर खाते बनावट असल्याचा खुलासा करायला एवढे दिवस का लागले? या प्रकरणात ज्या अटका झाल्या, महाराष्ट्रातील वाहनांना प्रत्यक्षात बंदी घालण्यात आली हे सर्व ट्विटरवर नव्हे तर प्रत्यक्षात झाले. याचा खुलासा करायला दिल्लीत बैठक बोलवावी लागली आणि आपली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन होयबा करून आले, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  गुरुवारी राज्य सरकारवर केली.

हेही वाचा – परवानग्या नाहीत, पण महामोर्चा होणारच; मविआ नेत्यांच्या बैठकीनंतर अजित पवारांचा ठाम निर्धार

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून झालेल्या महापुरुषांच्या अपमानाविरोधात मुंबईत १७ डिसेंबरला महाविकास आघाडीने मोर्चाचे आयोजन केले असून त्याच्या नियोजनासाठी आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा समाचार घेतला. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बसवराज बोम्मई यांच्या ट्वीटबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असता ते ट्वीटर अकाऊंट आपले नसून बनावट असल्याचे बोम्मई यांनी बैठकीत सांगितले. बोम्मई यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी टीका केली.

हेही वाचा – पोलीस परवानगी आणा, मगच एसटी देऊ; महामोर्चासाठी महामंडळाची आडकाठी!

- Advertisement -

जवळपास १५ ते २० दिवस सीमावादाचा प्रश्न चिघळला होता. मुख्यमंत्र्यांचे ट्वीटर हॅक झाल्याचा खुलासा करायला इतके दिवस का लागले? या प्रकरणात अटका प्रत्यक्ष झाल्या, महाराष्ट्रातल्या वाहनांना प्रत्यक्ष बंदी घालण्यात आली. हे सर्व ट्वीटरवर नव्हे तर प्रत्यक्षात घडले. मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला पाहिजे. तसेच ट्वीटर बाबतचा खुलासा दिल्लीत बैठक बोलवेपर्यंत का थांबला होता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

सर्वोच्च न्यायालयात प्रश्न प्रलंबित असताना दोन्ही राज्यांनी या प्रकरणात काही करू नये, हा काही नवीन सल्ला नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रश्न प्रलंबित असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला, विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. अशावेळी निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रानेच थांबायचे का? या गोष्टींचा नुसता उहापोह करून पोहे खाऊन निघणार असतील तर त्याला काही अर्थ नाही. कालच्या बैठकीत नेमके नवीन काय झाले?असा सवालही त्यांनी केला.

हे ट्वीट म्हणजे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. अशावेळी आपले मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र दिल्लीत होयबा करून आले,अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -