घरमहाराष्ट्रपरवानग्या नाहीत, पण महामोर्चा होणारच; मविआ नेत्यांच्या बैठकीनंतर अजित पवारांचा ठाम निर्धार

परवानग्या नाहीत, पण महामोर्चा होणारच; मविआ नेत्यांच्या बैठकीनंतर अजित पवारांचा ठाम निर्धार

Subscribe

मुंबई – महाविकास आघाडीकडून शिंदे फडणवीस सरकारविरोधात १७ डिसेंबरला महामोर्चा निघणार आहे. मात्र, या मोर्चासाठी अद्यापही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.त्यामुळे यावर विचारविमर्ष करण्याकरता आज महाविकास आघाडीच्या नेत्यांती बैठक पार पडली. या बैठकींनंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. परवानग्या मिळाल्या नसल्या तरीही महामोर्चा होणारच, असं अजित पवार म्हणाले. बैठक संपल्यानंतर अजित पवारांसह उद्धव ठाकरे आणि मविआतील सर्व नेत्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्री फुले यांच्याबाबत झालेली वादग्रस्त वक्तव्ये, महागाई आणि बेरजोगारी या सर्वांविरोधात हा महामोर्चा निघणार आहे. हा राजकीय मोर्चा नाही. राजकीय पक्षांसह अनेक समाजिक संस्था, अराजकीय मान्यवर या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चात विध्वंसक काहीही होणार नाही. शांततेत हा मोर्चा निघणार आहे. मोर्चासाठी परवानग्या मागितल्या आहेत. परवानग्या हातात आल्या नाहीत पण येतील, असा ठाम विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला. हा मोर्चा समस्त महाराष्ट्रातील जनतेचा आहे. जनतेने मोठ्या संख्यने मोर्चाला उपस्थित राहण्याच आवाहन अजित पवारांनी केलं.

- Advertisement -

हेही वाचा – महाविकास आघाडी सरकारचा विराट मोर्चा अद्याप पोलीस परवानगीच्या प्रतीक्षेत; पुढील रणनीती काय?

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हरिश साळवेंकडे द्या

- Advertisement -

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कर्नाटककडून रोहतगी बाजू मांडणार आहेत. ते देशातील टॉप वकिलांपैकी एक आहेत. तसंच, आपली बाजू मांडण्याकरता आपण हरिष साळवेंकडे प्रकरण द्यावं, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसंच, हरिश साळवे यांनाही पत्र लिहिले आहे. हरिश साळवे हे महाराष्ट्राचे, विदर्भाचे सुपूत्र आहेत. टॉप वकिलांमध्ये त्यांचीही गणती होते. त्यामुळे त्यांचा नावाचा विचार व्हावा, अशा आशयाचं पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे, असं अजित पवार म्हणाले.

मोर्चा कसा असेल?

17 डिसेंबरला सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे. याठिकाणी पोहचल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोरील एका ट्रकवर जाहीर सभा होईल. यावेळी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील, तर काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप यांच्यासह इतर वरिष्ठ नेते तसेच राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि इतर कार्यकर्ते शिवाय मित्र पक्षांतील नेते उपस्थित राहणार आहे. यासोबत काही सामाजिक संघटना देखील या मोर्चात सहभागी होती.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -