घरमहाराष्ट्रFuture Chief Minister : '2024 ला देवेंद्र...', बावनकुळेंच्या वक्तव्याने अजित पवार गटात खळबळ

Future Chief Minister : ‘2024 ला देवेंद्र…’, बावनकुळेंच्या वक्तव्याने अजित पवार गटात खळबळ

Subscribe

पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात येत आहेत. याशिवाय अजित पवार गटातील काही आमदारांकडूनही अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, सूतोवाच केले आहे. मात्र भाजपाकडून वारंवार एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील सांगण्यात येत असले तरी आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ ला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यासाठी कामाला असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे निवडणुकांआधीच महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी ‘घर चलो अभियानाअंतर्गत’ पिंपरी,चिंचवड, मावळ विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सला काळेवाडीत मार्गदर्शन केले. (Future Chief Minister Devendra Fadnavis in 2024 Chandra shekhar Bawankules statement stirs excitement in Ajit Pawar group)

हेही वाचा – इतर राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत येत असताना, एकनाथ शिंदे स्वतःच्या स्वार्थासाठी…; ठाकरे गटाचे टीकास्त्र

- Advertisement -

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आतापर्यंत आपण राज्यात पूर्ण बहुमताने सत्तेत कधीच आलो नाही. 124 च्या पुढे आपल्या आमदारांची संख्या कधी गेली नाही. गुजरात, राजस्थानमध्ये पूर्ण बहुमताने भाजपा सत्तेत येत आहे, पण महाराष्ट्रात एकहाती सत्ता येत नाही, याची खंत वाटते. यावर्षीचा महाविजय करण्यासाठी झपाटून काम करा. यावेळेस महाविजय झाल्यास पुढील 15 वर्षे महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येईल आणि त्यानंतर 15 वर्षे भाजपा सत्तेतून हटणार नाही, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

2024 ला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत

महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 ला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी मावळ, पिंपरी, चिंचवड मतदारसंघातील तिन्ही आमदार कमळाच्या चिन्हावर 51 टक्के मते घेऊन विजयी झाले पाहिजेत. मावळचा खासदार महायुतीचा होईल, यासाठी उमेदवार तिन्ही पक्षाचे नेते ठरवतील. बारामती लोकसभा मतदारसंघ महायुती 51 टक्के मते घेऊन 100 टक्के जिंकेल. लोकसभा निवडणूक जवळ येताच इंडिया आघाडीत असंतोष निर्माण होईल, मोठी ठिणगी पडेल, असेही बानवकुळे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Narendra Modi : देशाचं भलं करण्यासाठी पंतप्रधान मोदींना आताच…; प्रकाश आंबेडकरांनी केली ‘ही’ मागणी

2047 पर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही

राहुल गांधी 2047 पर्यंत पंतप्रधान होऊ शकत नाहीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीच राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत असे म्हटले आहे. त्यामुळे 2047 पर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही. कारण आपल्याकडे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत लांब रांग आहे, असेही  बानवकुळे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -