घरमहाराष्ट्रपहाटेचा शपथविधी, 2 जुलैचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

पहाटेचा शपथविधी, 2 जुलैचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

Subscribe

मुंबई : अजित पवार बंडखोरी करत 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा पथविधी घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बंडखोरी करत यावर्षी 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. परंतु अजित पवार यांनी घेतलेले दोन्ही शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून, असे स्पष्टीकरण शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. (Early morning swearing in July 2 swearing in keeping Sharad Pawar in the dark Explanation of Supriya Sule)

हेही वाचा – भाजपासोबत जाण्याच्या नेत्यांच्या आग्रहामुळे शरद पवार दुखावले; सुळेंनी सांगितले राजीनाम्याचे कारण

- Advertisement -

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची बुधवारी (11 ऑक्टोबर) टीव्ही 9 मराठीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवार यांची भूमिका आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठे खुलासे केले. याचपार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, छगन भुजबळ यांनीच कालच्या मुलाखतीत स्पष्ट केले की, दोन्ही शपथविधींची शरद पवारांना माहिती नव्हती. भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा झाली असं भुजबळ म्हणतात. भाजप आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणत होता, तर मग ते आमच्यासोबत चर्चा कशी काय केली, याचे उत्तर भाजपाने द्यावे.

भाजपाने एकीकडे आरोप केले तर, दुसरीकडे सोबत येण्याची ऑफर देत होते. खरं तर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागावी. ते करप्शन त्यांना मान्य असेल तर त्यांनी मान्य करावे की, ‘सब खाएंगे और सब को खाने देंगें’ ही आमची नीती आहे. एकीकडे भ्रष्ट्राचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे बॅक चॅनलने चर्चा करायची हा भारतीय जनता पक्षाचा दुतोंडीपणा नाही का? त्यांनी आम्हाला करप्ट पार्टी म्हटलं तरी सत्तेत कसं घेतलं? असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी विचारला. तसेच भाजपाने राष्ट्रवादी पक्ष फोडला. भाजपाने आमच्यावर सातत्याने खोटे आरोप केले. भाजपचा दुतोंडीपणा उघड होत आहे, असेही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Future Chief Minister : ‘2024 ला देवेंद्र…’, बावनकुळेंच्या वक्तव्याने अजित पवार गटात खळबळ

…म्हणून शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

अध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार हे भाजपासोबत जाण्यास कधीच तयार नव्हते. ते म्हणाले होते, तुम्हाला जायचे तर जा. भाजपासोबत चला असा आग्रह काही नेत्यांचा होता. नेत्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. पण मी यशवंतराव चव्हाण आणि माझ्या वडिलांच्या 60 वर्षांच्या विचारधारेच्याविरोधात जाण्याची माझी तयारी नव्हती. तो निर्णय मला अस्वस्थ करणारा होता. एका बाजुला सत्ता होती, आणि दुसऱ्या बाजुला संघर्ष होता. मी संघर्षाचा मार्ग निवडला, कारण मी विचारधारेच्या विरोधात जाऊ शकत नव्हते. मी रोज डायरी लिहिते. त्यामुळे मी काल काय बोलले हे मला माहित असते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -